शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ३५५५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, महावितरणची वसुली मोहीम तीव्र : ३७० पथके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 10:54 IST

थकीत वीज बिलांचा भरणा न करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ३५५ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणची पथके तैनात करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२ लाख ९३ हजार घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे ४० कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकीवीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणारवरिष्ठ कार्यालयातील अभियंते, अधिकारी यांचेही विशेष पथक तयारवीज बिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरूवीज बिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार

आप्पासाहेब पाटील सोलापूर दि ११ : थकीत वीज बिलांचा भरणा न करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ३५५ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणची पथके तैनात करण्यात आली असून, सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे़ यासाठी शाखानिहाय ३ अशी  ३७० पथके तैनात करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली़ वीज बिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीज बिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने मंगळवारपासून धडक मोहीम राबविण्या स सुरुवात केली आहे. त्यानुसार सोलापूर मंडलातील पंढरपूर, अकलूज, बार्शी, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहरातील थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यात वारंवार आवाहन करूनही थकीत वीज बिल न भरणाºया ३ हजार ५५५ पेक्षा जास्त थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या ३ दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १ कोटी ९ लाख २५ हजार रुपये थकीत आहेत.जिल्ह्यात सध्यस्थितीत २ लाख ९३ हजार घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे ४० कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत विशेष वीजतोड मोहीम राबविण्यात येणार आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यात थेट अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखाधिकारी तसेच हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. मोहिमेसाठी वरिष्ठ कार्यालयातील अभियंते, अधिकारी यांचेही विशेष पथक तयार केले आहे.वीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली धडक मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. वीज बिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या आॅनलाईन पेमेंटसाठी महावितरणची वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.---------------------------वीज बिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरूथकबाकी व चालू वीज बिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे  दि.११ व १२ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि.११) व रविवारी (दि. १२) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत़----------------विभागनिहाय अशी झाली वीजतोड मोहीम़़़अकलूज           ३५३             ८ लाख ४६ हजारबार्शी            ४६१           १८ लाख ८० हजारपंढरपूर           ९५७           २७ लाख ३० हजारसोलापूर ग्रामीण   ७२२           ३१ लाख ५६ हजारसोलापूर शहर    १०६२           २३ लाख १३ हजारएकूण        ३५५५         १ कोटी ९ लाख २५ हजाऱ-------------------थकबाकीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच होता़ त्यामुळे महावितरणला नाइजास्तव वीजतोड मोहीम सुरू करावी लागली़ वीजग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा वीजतोड मोहिमेस सामोरे जावे लागेल़-ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल़