शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेने केले दोघांचे निलंबन,एकाने केला अपहार तर दुसºयाने केली पदाधिकाºयांची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:34 IST

पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे.

ठळक मुद्देमागील वर्षभरात अनेक कर्मचारी स्वत:हून राजीनामा देऊन निघून गेलेजिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात बेफिकीर अनेक कर्मचाºयांवर कारवाई केली बँकेच्या कर्मचाºयांनी आता वसुलीवर भर दिला पाहिजे : राजन पाटील

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचारी स्वत:हून राजीनामा देऊन निघून गेले आहेत.बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या कारखाने, शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांसाठी घेतलेले कर्ज न भरल्याने बँक आर्थिक अडचणीत आली आहे. हे कर्ज वसूल होत नसल्याने संचालकच अडचणीत असल्याने अनेक सचिव व कर्मचाºयांनी इतरांना पाहिजे तसे कर्ज वाटप केले आहे. यामुळे एकूणच बँकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचारी किंवा विकास सोसायट्यांचे सचिव थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. या उलट बँकेची बदनामी करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. असाच प्रकार बँकेच्या मुख्यालयातील ज्युनियर अधिकारी एम. व्ही. ताठे यांनी केला होता. ताठे यांनी ११ नोव्हेंबर रोजी बँकेचे अध्यक्ष व पदाधिकाºयांविरोधात मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर अशोभनीय मेसेज पाठविला होता. बँकेने १३ नोव्हेंबर रोजी नोटीस दिल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या खुलाशात मानसिक स्थिती बिघडल्याने असा प्रकार झाल्याचे म्हटले होते. खुलासा अमान्य करीत ताठे यांच्यावर बँकेने निलंबनाची कारवाई केली. करमाळा शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत असताना आर. के. साळुंखे खाते उघडण्यासाठी ४७ ग्राहकांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतले. मात्र ही रक्कम बँकेत जमा केली नाही. १८ आॅगस्टला यापैकी तीन हजार रुपये भरणा केला. उर्वरित रक्कम भरणा केली नाही, शिवाय भरणा केलेली रक्कमही वापरून नंतर भरली. यामुळे साळुंखे यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात बेफिकीर अनेक कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. यामुळे काहींनी राजीनामा देऊन बँकेला बायबाय केला आहे.----------------कर्मचाºयांनी वसुलीवर भर द्यावा- बँकेच्या कर्मचाºयांनी आता वसुलीवर भर दिला पाहिजे. बँक कर्मचारी व विकास सोसायट्यांच्या सचिवांना पुढील महिन्यात वसुलीची जबाबदारी दिली जाणार आहे. घरबसल्या आलेली वसुली दाखवून नव्याने कर्ज वाटप करणे हेच केवळ कर्मचाºयांचे काम नाही. वसुलीसाठी खातेदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. असे होत नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आमच्यापैकी कोणताही संचालक वसुली करु नका, असे सांगत नसल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले. 

टॅग्स :Solapurसोलापूर