शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Solapur: कार्तिकीत दर्शन रांगेत भाविकांना मिळणार २४ तास चहा अन खिचडी  

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 20, 2023 19:26 IST

Solapur: यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

- काशिनाथ वाघमारे सोलापूर - यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

कार्तिकी यात्रेला अंदाजे १० लाख वारकरी भाविक येतात. त्यांना पुरेशा प्रमाणात सोई-सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दर्शनरांगेत बॅरेकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर, फॅन, मिनरल वॉटर, चहा, खिचडी वाटप करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच ४ दिवस पत्राशेडमध्ये २४ तास मोफत भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी २००० अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक सेवा करत आहेत.

आपत्कालीन व सुरक्षा व्यवस्थेसाठी ज्ञानदा फाऊंडेशन पुणे यांच्यामार्फत प्रशिक्षण, सोलापूर महानगरपालिकेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी आदी व्यवस्था केली आहे.देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी क्युआर कोड, सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.

अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक असतात. या भाविकांसाठी दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालविणे आवश्यक आहे. त्यासाठी दर ५० मीटर अंतरावर अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर