शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहर हागणदारीमुक्त करणार : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 16:44 IST

सोलापूर दि ३१ :   स्मार्ट सिटीमध्ये आलेले सोलापूर शहर १०० टक्के हागणदारीमुक्त करणार, असे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले.

ठळक मुद्देनागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणेगुड इव्हनिंग पथक यामध्ये महापालिकेचे सहाशे कर्मचारी नेमलेविभागीय कार्यालयाकरिता एक स्वतंत्र पालक अधिकारी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ :   स्मार्ट सिटीमध्ये आलेले सोलापूर शहर १०० टक्के हागणदारीमुक्त करणार, असे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले.या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, महिला व बालकल्याण अधिकारी दत्तात्रय चौगुले , बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे, आरोग्य समिती सभापती संतोष भोसले, नगरसेवक अ‍ॅड. यु.एन.बेरिया, गुरुशांत धुत्तरगावकर, गणेश वानकर, नागेश वल्याळ, फिरदोस पटेल, मेनका राठोड, मीनाक्षी कंपल्ली , कुमूद अंकाराम, विनोद भोसले आदी उपस्थित होते. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी संबंधित आरोग्य निरीक्षक  व विभागीय अधिकारी यांना नियोजन करण्याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. हागणदारीमुक्त अभियानांतर्गत नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणे, याकामी शासनाचे अनुदान देणे व यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना देणे ही कामे मनपा सेवकांनी करावीत, अशा सूचना महापौर बनशेट्टी यांनी दिल्या. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी जागा नाही त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये महानगरपालिका बांधून देणार आहे. मनपाची नादुरुस्त शौचालये लवकरच दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ़ गुड मॉर्निंग पथक, गुड इव्हनिंग पथक यामध्ये महापालिकेचे सहाशे कर्मचारी नेमलेले आहेत़ प्रत्येक विभागीय कार्यालयाकरिता एक स्वतंत्र पालक अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले़यावेळी नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील शौचालयासंबंधीच्या अडचणी सांगितल्या.  त्या अडचणी विचारात घेऊन त्याप्रमाणे कामे तातडीने करण्याबाबत महापौरांनी आदेश दिले.