शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

सोलापूर शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 14:35 IST

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान, गस्त वाढविण्याची मागणी

ठळक मुद्देएमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीघरावर पाळत ठेवून चोरटे डाव साधत आहेत

सोलापूर :  शहरात मागील दोन दिवसांपासून कुलूपबंद घरांवर नजर ठेवून हात साफ करणाºया चोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बुधवारी वसंत विहारमध्ये झालेली घरफोडी ताजी असताना पुन्हा दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करुन १ लाख ३२ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या दोन्ही चोरीच्या घटना २० जून रोजी आर्केड सेकंड प्लोअर गांधी नगर व  ए १ कॉम्प्लेक्स  येथे झाल्या.

साबेरा नूरमहमद मुजावर (रा. ए १ कॉम्प्लेक्स जोडभावी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साबेरा या वळसंग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.अज्ञात चोरट्याने बनावट चावीने फिर्यादीच्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश करून कपाटातील सोन्याची बोरमाळ, नेकलेस , कानातील झुमके, मंगळसूत्र , रिंग जोड , अंगठी,  पैंजण असा एकूण १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तसेच चोरट्याने त्याच कॉम्प्लेक्समधील हरिदास बाबुराव जोगदनकर यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला; मात्र त्यांच्या घरातून चोरट्याने काही नेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मात्रे करत आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीभगवान मच्छिंद्र कदम (वय ३५,रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड) यांचे घर फोडून चोरट्याने सात रुपयांचा करंडा व कडा तोडून चोरुन नेला.  चोरट्याने बनावट चावीने कदम यांच्या घराचा दरवाजा उघडून  कपाटातील चांदीचा  करंडा व कडा चोरुन नेला. कदम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट चावीचा वापरचोरट्यांनी आतापर्यंत येथे हातसफाई केली त्या ठिकाणी घराचा दरवाजा उघडण्यासाठी बनावट चावीचा वापर केल्याचे दिसून आले आहे. घरावर पाळत ठेवून चोरटे डाव साधत आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस