शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अर्थसंकल्पात सोलापूर मध्य रेल्वेला मिळाले ९०६ कोटी, जुनी कामे निकाली काढण्यासाठी ८०२ कोटी; हितेंद्र मल्होत्रा यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:41 IST

नुकताच केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये सोलापूर मध्य रेल्वे मंडळातील विविध कामांसाठी ९०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ठळक मुद्देजुनी प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त ८०२ कोटीनवीन कामांसाठी १०४ कोटी मंजूरसोलापूरसह आठ रेल्वे स्टेशनवर १९ सरकते जिने कार्यान्वित करण्यासाठी केंद्राने निधी मंजूर केलामोठ्या स्टेशनवर प्रत्येकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : नुकताच केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये सोलापूर मध्य रेल्वे मंडळातील विविध कामांसाठी ९०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये जुनी प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त ८०२ कोटी तर नवीन कामांसाठी १०४ कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दौंड-मनमाड या दुहेरीकरणाच्या कामासाठी २१० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. याशिवाय अहमदनगर-बीड-परळी या २५० कि. मी. अंतराच्या कामासाठी ४२५ कोटी मिळाले आहेत. या बजेटमध्ये प्रथमच पंढरपूर-फलटण, जेऊर-आष्टीसाठी नवीन लाईन टाकण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. सोलापूर विभागामध्ये एकूण २६९ क्रॉसिंग लाईनचे फाटक आहेत. यातील ११४ फाटक बंद करण्यात आले आहेत. यावर्षी २७ फाटक बंद करायचे आहेत. तीन वर्षात लेव्हल क्रॉसिंग बंद करण्याचा आराखडा तयार केला आहे. चालू वर्षी या कामासाठी १३ कोटी मंजूर झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात तीन क्रॉसिंग फाटक बंद करण्यात येणार असल्याचे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.जुन्या झालेल्या रेल्वे ट्रॅकच्या नूतनीकरणासाठी ९० कोटी या वर्षासाठी मंजूर झाले आहेत. १०० वर्षांपासून असलेल्या जुन्या १९ छोट्या पुलांच्या दुरुस्तीसाठी २.७ कोटी मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील वाकाव- माढा-वडशिंगे या १५ कि. मी. मार्गाचे दुहेरीकरण या वर्षात पूर्ण होणार आहे. पुढच्या वर्षी २०१९ मध्ये वडशिंगे, भाळवणी, बोराटी-कुलाली, गुलबर्गा-गाणगापूर या एकूण ८३ कि. मी. अंतरावरील डबलिंग (दुहेरीकरण)चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उर्वरित कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होतील. प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली असून वॉटर रिसायकलिंग प्रकल्प यापूर्वीपासूनच सोलापूर येथे सुरू आहे. सांडपाण्यातून दररोज ३.५ लाख लिटर पाणी पुन्हा वापरात आणले जात आहे. सोलापूर आणि दौंड येथे पाणी साधन यंत्राचे काम सुरू आहे. यापूर्वीच मंजूर असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, या अनुषंगाने केंद्राने या बजेटमध्ये जादा तरतूद केली आहे. दुहेरीकरणासाठी प्रलंबित असलेले सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-वाकाव आणि दौंड-भिगवण ही कामे पूर्ण झाल्यानंतरच नव्या गाड्या सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस सहा. रेल्वे प्रबंधक व्ही. के. नागर, वरिष्ठ अभियंता गौतम कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा यांची उपस्थिती होती.-------------------सोलापूरसह आठ स्टेशनवर सरकते जिनेसोलापूरसह आठ रेल्वे स्टेशनवर १९ सरकते जिने कार्यान्वित करण्यासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. यात सोलापूरसाठी ३, कुर्डूवाडी ३, दौंड ३, गुलबर्गा २, कोपरगाव २, पंढरपूर २, लातूर २, शिर्डीसाठी २ असा समावेश आहे. वेळेत पायाभूत सुविधा मिळाल्यास मार्च २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास रेल्वे प्रबंधकांनी व्यक्त केला. मोठ्या स्टेशनवर प्रत्येकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे- सोलापूर रेल्वे स्टेशनवर यापूर्वीच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय आणखी १५ कॅमेरे मंजूर झाले आहेत. याच विभागातील अहमदनगर, दौंड, गुलबर्गा, कोपरगाव, कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर हे कॅमेरे बसवण्यात येतील. रेल्वे वाडी-गुलबर्गा या ३८ कि. मी. अंतरावरील विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरRailway Passengerरेल्वे प्रवासी