शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचे पैसे अडकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द, सोलापूर बाजार समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:13 IST

सोलापूर : शेतकºयांचे पैसे अडकविणे व बाजार समितीचा सेस थकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय सोलापूर बाजार समितीने घेतला आहे. यापैकी काहींनी शेतकºयांचे पैसे चुकते केले तर पुन्हा त्यांना परवाने देता येणार नाहीत,  असा पणन मंडळाचा नियम असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची ...

ठळक मुद्देव्यापाºयांनी बाजार समितीचा सेसही भरला नाहीनोटिसा दिल्यानंतरही दखल न घेणाºया व्यापाºयांचे परवानेच रद्दमंत्री, आमदारही करतात शेतकºयांचे पैसे देण्यासाठी फोन

सोलापूर : शेतकºयांचे पैसे अडकविणे व बाजार समितीचा सेस थकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय सोलापूर बाजार समितीने घेतला आहे. यापैकी काहींनी शेतकºयांचे पैसे चुकते केले तर पुन्हा त्यांना परवाने देता येणार नाहीत,  असा पणन मंडळाचा नियम असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची बैठक सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत ४१ विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. मागील ५-६ महिन्यांपासून अनेक अडते (व्यापारी) शेतकºयांचा माल विक्री करतात परंतु पैसे देत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. यापैकी काही शेतकºयांनी बाजार समिती प्रशासक व सध्याच्या संचालक मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. काही व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले धनादेश वटले नाहीत.

शेतकºयांनी व्यापारी व बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे मारूनही काही उपयोग झाला नाही. यापैकी काही व्यापाºयांनी बाजार समितीचा सेसही भरला नाही. यामुळे नोटिसा दिल्यानंतरही दखल न घेणाºया व्यापाºयांचे परवानेच रद्द करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. 

मंत्री, आमदारही करतात फोन- सोलापूर बाजार समितीमध्ये लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यातील शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. अधिक दराने मालाची विक्री करतो, अशी बतावणी करून शेतकºयांना आपल्याकडे माल टाकायला लावले जाते व त्यांना धनादेश देऊन फसविले जाते. असे शेतकरी त्या-त्या भागातील पदाधिकाºयांमार्फत सोलापूर बाजार समितीला फोन करून पैसे देण्यास सांगतात. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, आमदार सुरेश धस व अन्य आमदारांनीही शेतकºयांचे पैसे देण्यासाठी फोन केले होते. तरीही व्यापाºयांनी जुमानले नसल्याचे सांगण्यात आले. 

यांचे केले परवाने रद्द - तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रविकांत पाटील, अविनाश पाटील, एम. आय. कल्याणी, संतोष बणजगोळे, सुरेश जाधव-पाटील, जिलाणी कल्याणी, धानप्पा दहिटणे, नसीर अहमद खलिफा, अनिल हेबळे, म. कैफ ट्रेडर्स, अमन कल्याणी, छोटूभाई बागवान, ताजबाबा ट्रेडिंग कंपनी, कल्याणी ट्रेडर्स, कैलास पौळ, पैलवान ट्रेडर्स, बाबा ट्रेडर्स, काका ट्रेडर्स, आसिफ ट्रेडर्स, रूद्रेश पाटील, महेश बिराजदार, इब्राहीम बागवान, एस. एम. ट्रेडर्स आदी. 

शेतकºयांची बाजार समिती आहे, त्यांचीच अडवणूक होत असेल तर नियमाप्रमाणे कारवाई होणार. आमच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर अनेक व्यापाºयांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे.- दिलीप माने,सभापती, सोलापूर बाजार समिती 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती