शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

Solapur: दोन वेळच्या कर्जमाफीनंतरही एकरकमी परतफेडकडे पाठ! सवलत वाढवून योजना सुरू ठेवण्याची मागणी

By दिपक दुपारगुडे | Updated: April 5, 2023 16:31 IST

Solapur: सतत दोन वेळा झालेल्या कर्जमाफीनंतर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेने आणलेल्या ओटीएस (एकरकमी परतफेड) योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आगाऊ सवलत देऊन योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

- दीपक दुपारगुडे सोलापूर : सतत दोन वेळा झालेल्या कर्जमाफीनंतर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेने आणलेल्या ओटीएस (एकरकमी परतफेड) योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आगाऊ सवलत देऊन योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

राज्य शासनाकडून मागील पाच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्यात आली. कर्ज काढून थकबाकीत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविता. मात्र, प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता अशी भावना निर्माण झाल्याने दोन वेळा कर्जमाफी झाल्यानंतर थकबाकीदारांची संख्या वाढत राहिली. थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा वाढत चालल्याने डीसीसी बँकेने ओटीएस योजना आणली. ३० जून २०२० रोजीच्या थकीत अल्प, मध्यम व दीर्घ मुदत शेतीकर्जासाठी ओटीएस योजना राबविण्यात आली.

सप्टेंबरपासून मार्चपर्यंत ७ महिन्यात २८ हजार ३९ शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना राबवली. मात्र, शेतकऱ्यांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील आकडेवारीवरून दिसत आहे. मार्चपर्यंत ३,६६२ शेतकऱ्यांनी ओटीएस योजनेसाठी अर्ज केले. त्यातील ३,४८९ प्रस्ताव मंजूर झाले. या पात्र मंजूर शेतकऱ्यांची रक्कम ८७ कोटी ३२ लाख रूपये इतकी आहे. आजही थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या २५ हजारांवर असल्याने सवलतीत वाढ करून योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.२४ कोटी मिळाली सवलतओटीएस योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना व्याजात सवलत दिल्याने बँक व विकास सोसायटीने २४ कोटी ८ लाख रूपये सूट दिली आहे. यामुळे ३,४८९ थकबाकीत गेलेले शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांना नव्याने कर्जही मिळाले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी