शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: विठ्ठलाचे जलद दर्शन घडवण्यासाठी पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातांवर गुन्हा दाखल

By दिपक दुपारगुडे | Updated: August 4, 2023 18:16 IST

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: विठ्ठलाचे जलद दर्शन घडवून भाविकांकडून पैसे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सागर बडवे व शंतनु उत्पात (दोघे रा. पंढरपूर) यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- दीपक दुपारगुडे सोलापूर -  विठ्ठलाचे जलद दर्शन घडवून भाविकांकडून पैसे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सागर बडवे व शंतनु उत्पात (दोघे रा. पंढरपूर) यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बडवे व उत्पात यांनी तुळशीपूजेचे निमित्त करून समितीचे व्यवस्थापकांची भेट घेतली अन् महिला सुरक्षारक्षक यांना दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले आहे, असे खोटे सांगून दोन इसमांना दर्शनास सोडण्याचा प्रयत्न करुन समितीच्या कर्मचाऱ्याची फसवणूक केल्याची फिर्याद देण्यात आली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मंदिर परिसरात राहणारे सागर बडवे व शंतनु उत्पात हे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे आले. त्यापैकी सागर बडवे हा व्यवस्थापक पुदलवाड यांच्या केबिनमध्ये जाऊन समोरील लोकांना तुळशीपूजा करावयाची आहे असे सांगितल्याने पुदलवाड यांनी त्यांना नित्योपचार विभागाकडून तुळशीपूजा करावयाची परवानगी घेण्यास सांगितले.

तुळशीपूजेची पावती न करता सागर बडवे व शंतनु उत्पात हे विठ्ठल सभा मंडप येथे दोन इसमांना घेऊन आले महिला सुरक्षारक्षक प्रज्ञा वट्टमवार यांना रावसाहेबांनी या दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोन इसम आतमध्ये गेल्यानंतर तो प्रकार सीसीटीव्ही कर्मचारी प्रकाश पाटील यांच्या लक्षात आल्याने बीडीडीएस पोलिस कर्मचारी वामन यलमार, महिला सुरक्षा कर्मचारी प्रज्ञा वट्टमवार या सर्वांनी मिळून त्यांना दर्शनाला न सोडता परत कार्यालयात आणून व्यवस्थापक पुदलवाड यांच्याकडे विचारपूस केली. यावेळी प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर