सोलापूर : जि़प़व पं़ स साठी २४ तर मनपासाठी ३३ टक्के मतदानसोलापूर : मतदान यंत्रात बिघाड, मतदार यादीत नावाचा घोळ, बोगस मतदार यामुळे काही ठिकाणी उडालेला गोंधळ व किरकोळ प्रकार वगळता सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दुपारी २ पर्यंत २४ तर महापालिकेसाठी ३३ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७़३० वाजल्यापासून मतदानाास प्रारंभ झाले आहे़ शहरात सर्वत्र शांततेत मतदान सुरू होते़ काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ गोंधळ उडाला होता़ शिवाय शहरातील बहुतांश मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने काही मतदारांना मतदानापासून दुरच रहावे लागत आहे़ काही ठिकाणी मशीन लॉक होणं, बंद पडणं असेही तांत्रिक प्रकार घडले आहेत़ प्रभाग २५ व १४ मध्ये काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना मारहाण केली़ तर प्रभाग १८ येथील केंद्रातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने ते बंद पडले़ जिल्हा परिषदेच्या ६८ तर पंचायत समितीच्या २७८ जागांसाठी मतदान होत आहे़ दुपारी २ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे़
सोलापूर : जि़प़व पं़ स साठी २४ तर मनपासाठी ३३ टक्के मतदान
By admin | Updated: February 21, 2017 14:26 IST