शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील डिपार्टमेंट गार्डनमध्ये साकारतेय स्लायडिंग लायब्ररी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:14 IST

स्मार्ट सिटीतील प्रकल्पातून होतेय साकार; स्पर्धा परीक्षा देणाºयांची होणार सोय

ठळक मुद्देडिपार्टमेंट गार्डनमध्ये स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय साकारण्यात येणार स्मार्ट सिटी योजनेतून पासपोर्ट कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या उद्यान विभागात डिपार्टमेंट गार्डनचे नूतनीकरण पूर्ण१0 मेपर्यंत बाग अत्याधुनिक लुकच्या स्वरूपात शहरातील बच्चे मंडळी, तरुणवर्ग आणि ज्येष्ठांच्या सोयीनीशी खुली होणार

राजकुमार सारोळेसोलापूर : महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यालयात साकारण्यात येणाºया डिपार्टमेंट गार्डनमध्ये स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय साकारण्यात येणार आहे. यासाठी या बागेत स्लायडिंग लायब्ररीची सोय करण्यात येत आहे.स्मार्ट सिटी योजनेतून पासपोर्ट कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या उद्यान विभागात डिपार्टमेंट गार्डनचे नूतनीकरण पूर्ण करण्यात येत आहे. १0 मेपर्यंत बाग अत्याधुनिक लुकच्या स्वरूपात शहरातील बच्चे मंडळी, तरुणवर्ग आणि ज्येष्ठांच्या सोयीनीशी खुली होणार आहे. 

विविध वैशिष्ट्य असलेली ही बाग सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. लहान मुलांसाठी बागेत अ‍ॅम्युजमेंट पार्क तयार करण्यात आले आहे. यात मुलांना साहसी खेळणी व जंगल जीवन लक्षवेधक ठरणार आहे. ज्येष्ठांसाठी कॉफी हाऊस उभारण्यात आले आहे. सिद्धेश्वर तलावाकाठी बेंचवर बसून कॉफीचा आस्वाद घेत गप्पा मारता येणार आहे. याचबरोबर फिरावयास आलेल्यांसाठी पेव्हर वॉकवेचा उपयोग होणार आहे. 

आणखी एका वैशिष्ट्याने ही बाग लक्षवेधी ठरत आहे, ते म्हणजे स्लायडिंग लायब्ररी. यासाठी तयार करण्यात आलेला खास कक्षाचा दरवाजा सरकता आहे. यात ६ मुलांना बसून स्पर्धा पुस्तके वाचता येणार आहेत. या लायब्ररीत स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापेक्षा जास्त मुले अभ्यासासाठी आली तर त्यांना बागेतील बेंचचा उपयोग करता येणार आहे. या ग्रंथालयाची हाताळणी ज्येष्ठ नागरिकांच्या हाती सोपविण्याचा प्रस्ताव आहे. ही पुस्तके फक्त बागेतच हाताळता येणार आहेत. बागेला शुल्क आकारण्याचाही प्रस्ताव आहे. 

काय आहे स्लायडिंग लायब्ररीची संकल्पनाया बागेत निव्वळ उनाडक्या करण्यासाठी येणाºयांना मज्जाव राहणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºयांना येथे वाव असणार आहे. त्यामुळे अभ्यासाला अडथळा होईल अशा गोष्टींना प्रतिबंध राहणार आहे. यावर सीसी कॅमेºयाची नजर राहणार आहे. मुलांच्या वेळेत हे ग्रंथालय बंद राहील. सहजपणे सरकणाºया दरवाजातून या लायब्ररीत प्रवेश मिळणार आहे. नोंद केल्याशिवाय पुस्तक मिळणार नाही. 

उद्यान विभाग बागेचा विकास वेगळ्या पद्धतीने- दोन एकराच्या या बागेत आधी महापालिकेच्या उद्यान विभागाचे कार्यालय, रोपवाटिका होती. हे कार्यालय पाडून दुसरीकडे हलविण्यात आले आहे. आता या ठिकाणी रोपवाटिका, रेन हॉर्वेस्टिंग मॉडेल, ई टॉयलेट, साऊंड सिस्टिम अशी व्यवस्था राहणार आहे. 

दिवस ठरणार- शहरातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ही बाग असणार आहे. त्यामुळे या बागेत कोणत्या दिवशी काय करता येईल याचे एक स्वतंत्र वेळापत्रक करण्याचा विचार आहे. सुटीदिवशी मुले जास्त येतात. त्यामुळे रविवारी अ‍ॅम्युजमेंट पार्क दिवसभर खुले ठेवावे लागणार आहे. स्लायडिंग लायब्ररी सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन सत्रात चालू राहील. 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग