शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे....अतिवृष्टीच्या पुरात वाहून गेला अन् चार महिन्यांनी सांगाडा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:22 IST

तपासात निष्पन्न : बार्शीच्या बाजार समितीत तोलार म्हणून होता कामाला

बार्शी : अतिवृष्टीने जिल्ह्यात अनेकांना भोगावे लागले. गुरेढोरे वाहून गेली. मन्युष्यहानीही झाली. या नैसर्गिक हानीत कामावरून घराकडे निघालेला तरुण महापुराच्या लोंढ्यात वाहून गेला. आता चार महिन्यांतर त्याचा सांगाडा मंगळवारी सकाळी एका झाडास अडकून पडल्याचा पोलिसांना आढळून आले. अजय उर्फ दादा चौधरी (वय- ४०, रा. बार्शी) असे या तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हा सांगाडा बार्शी- तुळजापूर रोडवरील अशोका हाॅटेलचे मालक महेंद्र  सावळे यांना दिसला. त्यांनी मयताचे नातेवाईक किशोर चौधरी यांना फोनवरून कल्पना दिली. त्यानंतर  मयताची पत्नी स्वाती,भाऊ  किशोर  चौधरी, सासू आशा चौधरी चुलत भाऊ कृष्णा चौधरी यांनी तेथे जाऊन पाहणी केली. 

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. पहाणी करताना  दाट असलेल्या  चिलरीच्या झाडास अडकलेला सांगाडा दिसला. मयताच्या पत्नीने मानेच्या हाडांमध्ये गुंतलेला शर्ट पाहून ज्या दिवशी  वाहून गेले त्या दिवशी  तोच शर्ट त्यांच्या अंगावरही होता असे सांगितले.  शिवाय या सांगाड्याची  बांधणी   पतीच्या शरीरयष्टीशी मिळतीजुळती असल्याने पत्नीने हा सांगाडा आपल्याच पतीचा असल्याचे सांगितले.यातील मयत हा येथील बाजार समितीत तोलार म्हणून काम करत होता. १४ ऑक्टोबर २०२० रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तो काम संपवून  फपालवाडी रोडवरील ओढ्यानजीकच्या    राणा कॉलनीत असलेल्या घरी  या ओढ्यातील पाण्यातून जात होता. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो जाताना  पाण्यात  पडून वाहून गेला. नाकातोंडात पाणी जाऊन मयत झाला. तपास न लागल्याने पोलिसांत तो वाहून गेल्याची  नोंद झाली होती.

---------------जागेवरच पंचनामा.. सांगाडा नातलगाच्या ताब्यात

  • - या घटनेनंतर मयताच्या नातेवाइकास तहसीलदार यांनी भेटही दिलेली होती. परंतु अद्यापही शासनाची कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
  • - मंगळवारी सांगाडा मिळताच शहर पोलीस नाईक श्रीमंत खराडे  यांनी पंचनामा केला. जागेवरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शवविच्छेदन करून नातेवाइकाच्या ताब्यात दिले. 
  • - याबाबत  ठाणे अंमलदार पोलीस नाईक दादासाहेब माने यांनी  सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय ज्ञानेश्वर उदार करत आहेत.

 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीbarshi-acबार्शी