शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
4
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
5
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
6
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
7
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
8
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
9
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
10
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
11
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
12
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
13
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
14
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
15
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
16
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
17
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
18
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
19
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
20
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

सिंघल रजेवर; गुडेवार सीईओ

By admin | Updated: June 13, 2014 00:40 IST

गुरुवारी निघाला आदेश; गुडेवार लागले कामाला

सोलापूर: जिल्हा परिषद सीईओ श्वेता सिंघल या अखेर प्रसूती रजेवर गेल्या असून मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. जि. प. पदाधिकाऱ्यांनीच गुडेवार यांच्याकडे पदभार देण्याची मागणी करणारे पत्र दिले होते.तुकाराम कासार यांच्या कारभाराला कंटाळलेल्या पदाधिकाऱ्यांना सिंघल या काहीतरी करतील, अशी अपेक्षा होती. १० फेब्रुवारी २०१४ रोजी पदभार घेतल्यानंतर ‘डॅशिंग’ काम न केल्याने कासारच बरे म्हणण्याची वेळ आली. जिल्हा परिषदेचे खरे कामकाज ग्रामीण भागात आहे. प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र-उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने सीईओ म्हणून सिंघल यांनी किंवा खातेप्रमुखांनीही कधी तपासले नाहीत. मुख्यालयातही हीच अवस्था असताना कधी लक्ष दिले नाही. शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्याची फाईल पाच महिन्यांनंतरही निकाली काढली नाही. शिक्षण सेवकांप्रमाणेच अन्य कामांच्या फायलींचेही असेच हाल सुरु ठेवले होते. अशा कारभाराला कंटाळलेल्या जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. अन्य पदाधिकारीही सीईओंच्या कामकाजाला कंटाळले होते. त्यांनीच सिंघल यांना रजेवर पाठवा व गुडेवार यांच्याकडे पदभार द्या, अशी मागणी केली होती. विभागीय आयुक्त, पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांनाही पदाधिकाऱ्यांनी सिंघल यांचा पदभार काढण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार गुरुवारी सिंघल यांची रजा मंजूर करुन गुडेवार यांना पदभार देण्याचे पत्र विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काढले. ते मिळताच लागलीच सिंघल यांनी गुडेवार यांच्याकडे पाच वाजता पदभार सोपविला. विभागीय आयुक्तांच्या आदेशात अतिरिक्त सीईओ हजर होईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पदभार सांभाळावा, असे म्हटले आहे. ------------------कामाच्या नियोजनाचे आव्हान...जलसंधारण, पाणी अडविण्याच्या कामांचे नियोजन करावे लागणारप्राथमिक शाळांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागणारमुख्यालयातील विविध कार्यालयातील फायलींचा निपटारा होण्यासाठी तपासणी करावी लागणारआरोग्य केंद्र बंद आहेत की सुरू?, हे पाहावे लागणारमागील वर्षीचा अखर्चित व यावर्षीचा निधी खर्च होण्यासाठी तातडीने नियोजन, मंजुऱ्या व खरेदीचे आदेश द्यावे लागणारग्रामपंचायतींच्या कामाची पाहणी कोणीच करीत करीत नाही, ते करावे लागणारशौचालय बांधण्याच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक-------------------खातेप्रमुखांची रात्री ९ वाजता बैठक...गुडेवार यांनी यापूर्वी उस्मानाबाद, अमरावती, अकोला जि.प.ला काम केले असून उस्मानाबादला अतिरिक्त सीईओ असताना त्यांच्याकडे सीईओंचा पदभार होता. त्यांनी ठेकेदारी करणाऱ्या ९ जि.प. सदस्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या गुडेवारांनी पदभार घेताच रात्री ९ वाजता जि.प.च्या खातेप्रमुखांची बैठक बोलावली. तुकाराम कासार व श्वेता सिंघल यांच्या कालावधीत जि.प.च्या ढेपाळलेल्या कारभाराला वेग देण्याचे काम गुडेवार यांना करावे लागणार आहे.