शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा; नंदीध्वज मिरवणूक रद्द, यात्राकाळात भाविकांना प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 8:54 AM

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेबाबत प्रशासनाचा आदेश; धार्मिक विधीसाठी ५० जणांना परवानगी

सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा कशी होणार याची चर्चा होत असतानाच महापालिका आयुक्तांनी यात्रा परवानगी कशी असेल याबाबतचा आदेश शनिवारी रात्री उशिरा पारीत केला. यानुसार १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाºया यात्रेसाठी मंदिर भाविकांना बंद असणार असून जिल्हा व परराज्यातून भाविक येणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त आदेश जारी करणार आहेत. नंदीध्वज मिरवणूर रद्द करण्यात आली असून, धार्मिक विधीसाठी ५0 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 

महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रा नियोजनाबाबत सात पाती आदेश जारी केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने ११ डिसेंबर रोजी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर पोलीस आयुक्त व अधीक्षक कार्यालयाने अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायावरून शासनाकडून परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांना विनंती केली होती. जिल्हाधिकाºयांनी १६ डिसेंबरला हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

शासनाने २४ डिसेंबरला धार्मिकस्थळे सुरू करताना कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून घालून दिलेल्या नियमावलीनुसार विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हाधिकाºयांनी निर्णय घ्यावा असे कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांकडे यात्रेबाबत प्रस्ताव सादर केला.  त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पोलीस आयुक्त व अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून घातलेल्या अटींचे पालन करून परवानगी देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना ८ जानेवारी दिले आहेत.

यण्णीमजनला नाही परवानगी

या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रेतील नियम अटीचा आदेश जारी केला. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी रोजीच्या यण्णीमजनसाठी नंदीध्वज मिरवणुकीला परवानगी नाही. पण ११ जानेवारी रोजी मानाचे सातही नंदीध्वज मंदिर परिसरात सजवून प्रत्येक नंदीध्वजासोबत ५ प्रमाणे ३५ व्यक्ती व १५ पुजारी अशा ५0 जणांना मास्क, फिजीकल डिस्टन्स व सॅनीटायझरच्या वापरासह परवानगी दिली आहे. पंच कमिटीने दोन दिवस आधी ही नावे पोलिसांना द्यायची आहेत.

अक्षता सोहळ्यास असतील ५0 जण

यात्रेच्या दुसºया दिवशी म्हणजे १३ जानेवारीला अक्षता सोहळा आहे. यानिमित्त मंदिरापासून संमतीकट्ट्यापर्यंत ७ नंदीध्वज आणण्यासाठी ३५ मानकरी व अक्षता सोहळ्यासाठी १५ पुजाºयांना परवानगी दिली आहे. हा कार्यक्रम संपल्यावर नंदीध्वज मंदिरात निश्चित केलेल्या जागी जातील  अशाच पद्धतीने १४ जानेवारी रोजी तीळ, हळदीचे उटणे लेपन करून नंदीध्वजांना गंगास्नान करण्यासाठी योगदंडाच्या मानकºयांना परवानगी देण्यात आली आहे.

मानकºयांना पोलीस आयुक्तालयाचा पास राहणार आहे.  नागफणी, सजावटीस नाही परवानगीनंदीध्वज मंदिर परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी राहतील. धार्मिक विधीसाठी मंदिर परिसरात नेण्यास परवानगी राहिल. नागफणी व इतर सजावट करून मिरवणुकीस बंदी असेल. होम विधीसाठी होम मैदानावर परवानगी असलेल्या ५0 जणांना जाता येईल. १५ जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम व १६ जानेवारी रोजी होणाºया कप्पडकळ्ळी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. मंदिर राहणार बंदयात्रा काळात श्री सिद्धेश्वर मंदिर बंद राहणार आहे. पंच कमिटीने भाविकांना लाईव्ह दर्शनाची सोय करावी. यात्रा काळात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी देवस्थानने परिसरात स्वत:चे सुरक्षा रक्षक नेमावेत. मंदिर परिसर व शहरात पोलीस आयुक्तालय स्वतंत्र बंदोबस्त लावतील.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका