सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वरांचा ८३४ वा संजीवन (शिवयोगी) समाधी सोहळा रविवारी साजरा झाला. 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय'चा जयजयकार करीत भाविकांनी स्वतःला धन्य मानले.सकाळी ६ वाजता समाधीस्थळी सामूहिक रुद्र पठण झाले. सकाळी साडेआठ वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर गाभाऱ्यात रुद्राभिषेक आणि मंत्रघोष झाला.मंदिरातील पुजारी आनंद हब्बू, शिवशंकर हब्बू आणि हब्बू परिवाराच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी आस्वाद घेतला. रात्री पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सांगता होणार आहे.
सिद्धरामांची समाधी फुलांनी सजली; 'हर्र बोला हर्र'चा जयजयकार झाला!
By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 26, 2023 14:08 IST