शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी श्वेताली डांबरे, सचिवपदी करमाळ्याची राणी गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:16 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागून असलेल्या सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयातील एम. एस्सी. वर्गातील विद्यार्थिनी श्वेताली डांबरे तर सचिवपदी प्रतापसिंह मोहिते महाविद्यालयातील बी. एस्सी.तील राणी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देसलग १२ व्या वर्षीही जनसेवा संघटनेने या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले आहेजनसेवा संघटना एक व्यासपीठ : डॉ. धवलसिंह मोहिते-पाटीलविद्यार्थी प्रश्न मांडण्यासाठी सर्व समिती सदस्यांचे सहकार्य घेत कार्य करणार : श्वेताली डांबरे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागून असलेल्या सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयातील एम. एस्सी. वर्गातील विद्यार्थिनी श्वेताली डांबरे तर सचिवपदी प्रतापसिंह मोहिते महाविद्यालयातील बी. एस्सी.तील राणी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.सलग १२ व्या वर्षीही जनसेवा संघटनेने या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले आहे. अध्यक्ष व सचिव पदासाठी सामाजिक शास्त्रे संकुलात गुरुवारी निवड प्रक्रिया झाली. अध्यक्ष व सचिव पदासाठी एकेक अर्ज दाखल झाले. राणी गायकवाड यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुषमा बिराजदार व सुरभी कुलकर्णी यांच्या सूचक, अनुमोदक म्हणून सह्या होत्या. श्वेताली डांबरे यांच्या अर्जावर स्वाती राठोड व पूजा पटणे यांच्या सह्या आहेत. निवडणुकीवेळी विद्यार्थी समिती सदस्य स्वाती राठोड, रोहित डिसले,   सुषमा   बिराजदार, पूजा पटणे, राणी गायकवाड, भाग्यश्री कदम, शारदा प् ाडवळे, सुप्रिया नलावडे, सुरभी कुलकर्णी, गणेश मेरगू यांची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. ए. ए. घनवट, डॉ. गौतम कांबळे, डॉ. सूर्यकांत शिंदे यांनी काम पाहिले. निकाल जाहीर होताच विद्यापीठ परिसरात जल्लोष करण्यात आला. डॉ. आंबेडकर चौक (पार्क चौक) येथील जनसेवा विद्यार्थी संघटना कार्यालयात डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी अध्यक्ष, सचिव व मंडळ सदस्यांचा सत्कार केला. यावेळी प्रकाश नीळ, लहू गायकवाड, जनसेवेचे अभिराज शिंदे, जिल्हा अध्यक्ष सतीश पालकर, जुल्कर शेख, सुधीर रास्ते, मयूर माने, राहुल पाटील, योगेश बोधले, प्रशांत जगताप, निखिल जोशी, गणेश महाडिक, गणेश जगताप, विवेक शिंदे, ओंकार साने आदी उपस्थित होते. ------------------------जनसेवा संघटना एक व्यासपीठ : मोहिते-पाटील- विद्यार्थी मंडळ निवडणुकीत कोणताही पक्षभेद नसावा. त्यांचा वावर नसावा. जनसेवा संघटना विद्यार्थ्यांसाठी एक सक्रिय व्यासपीठ आहे. यातून विद्यार्थी नेतृत्व उभे राहते. त्यास योग्य दिशा, मार्गदर्शन देणे इतकीच संघटनेची भूमिका आहे. कोणताही पक्ष या निवडणूक प्रक्रियेत निगडित नसावा, निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना लाभावे यासाठी समन्वयकाची भूमिकाही असते. असे मत डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. -------------------विद्यार्थी प्रश्न मांडण्यासाठी सर्व समिती सदस्यांचे सहकार्य घेत कार्य करणार आहोत. जनसेवा संघटनेचे डॉ. धवलसिंह यांच्यासह संघटना पदाधिकारी, शिवदारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत कार्यरत राहणार. -श्वेताली डांबरे, अध्यक्ष, विद्यार्थी परिषद, सोलापूर विद्यापीठ.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर