शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून शटर बंद; आत सारं आलबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST

रिॲलिटी चेक विलास जळकोटकर सोलापूर : कोरोना महामारीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हा संसर्ग व्यापक स्वरूपात पसरू नये, यासाठी ...

रिॲलिटी चेक

विलास जळकोटकर

सोलापूर : कोरोना महामारीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हा संसर्ग व्यापक स्वरूपात पसरू नये, यासाठी शासनाकडून शहर-जिल्ह्यासाठी सायंकाळी चारपर्यंत निर्बंध घातले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात असतानाही शहरात अनेक ठिकाणी पुढून किराणा दुकाने, हॉटेलचे शटर बंद करून पाठीमागून जेवण वा किराणा साहित्य सहज मिळू लागले आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरभर फेरफटका मारला असता हे वास्तव समोर आलं.

शहरातील गजबजलेल्या बसस्थानकामध्यील कँटीन सुरू असल्याचं दिसून आले. येथे बाहेरून पार्सल देणं सुरू होतं; मात्र याच आवारातील स्टेशनरी दुकानं मात्र निर्बंधांच्या वेळेनंतरही उघडी असल्याचं दिसून आलं. तेथून पुढे बाळीवेस, मधला मारुती, कोंतम चौक, चाटी गल्ली, कुंभारवेस परिसरात एखाद्‌दुसरं दुकान वगळता शटरडाऊन होतं. मात्र, काहींनी समोरचं शटर बंद ठेवून आतून सेवा सुरू असल्याचे चित्र पहायला मिळालं. कॉलनी, नगरांमधील किराणा दुकाने, दूध डेअरींची सेवा मात्र बिनधास्त सुरू असल्याचं चित्र दररोज पहायला मिळू लागलं आहे.

-----

कोरोनाकाळात दुकानदारांवर कारवाई

पहिल्या लाटेनंतर - १२३५

दुसऱ्या लाटेनंतर - ५०४

-----

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा. जे कोणी निर्बंध वेळेनंतरही दुकाने, आस्थापना उघडी ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

----

या दुकानांवर लक्ष कोणाचे?

निर्बंधानंतरही दुकाने, स्टेशनरी, हॉटेल उघडे ठेवणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिकाऱ्यांना पेट्रोलिंग करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी मोबाइल व्हॅनसह डीबी पथक तैनात ठेवले आहे. तसेच महापालिकेचे पथकही यासाठी तैनात केले आहे.

----

हे घ्या पुरावे...!

कन्ना चौक : सायंकाळी ५.४५

एकीकडे नियम पाळून निर्बंधांची वेळ संपताच दुकाने बंद केली जात असताना कन्ना चौक परिसरात मात्र सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाष्टा सेंटर, बाजूला चहा, पाणीपुरीसाठी लोकांनी गर्दी केल्याचंही दिसून आलं. आजूबाजूला शुक शुक करून पोलीस गाडी तर आली नाही ना, याचा कानोसा घेतला जात असल्याचे पहायला मिळाले.

-----

शुक्रवार पेठ : ५.३०

रिमझिम पावसातही किराणा दुकानाचा दरवाजा अर्धवट लावून ग्राहकांना हवं ते देण्यासाठी दुकानदार बाहेरच उभा असल्याचं चित्र शुक्रवार पेठ परिसरात दिसून आलं. दुचाकीवरून आलेल्या ग्राहकाला हवं ते साहित्य दिलं जात होतं. विजापूर वेस परिसरातही तुरळक ठिकाणी अशीच स्थिती दिसून आली.

----

काय हवंय सांगा मिळेल

- कोरोना संसर्गाची भीती न बाळगता चोरून मागल्या दाराने सेवा पुरविण्याचे काम सुरू असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलं. दुकान अथवा हॉटेलच्या बाहेर एखादी व्यक्ती थांबते. ग्राहक आला की, त्याला पाठीमागच्या दिशेने पाठवून दिले जाते. यावरून निर्बंधाची ठरवून दिलेली वेळ हा फार्सच ठरू लागला आहे.

------