शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

उजनीवर शटडाऊन ! सोलापूर शहराला आजपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:51 IST

सोलापूर दि २४ : अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्यासाठी बुधवारी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देजनी जलवाहिनीवरील सर्व व्हॉल्व्ह बदलण्याचे काम आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा ठेकेदाराची पाच पथके कामासाठी तयार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्यासाठी बुधवारी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दीर्घकालीन पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी अमृत योजनेतून जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड बदलणे, केगाव ते जुना पुणे नाका जलवाहिनी बदलणे आणि उजनी जलवाहिनीवरील सर्व व्हॉल्व्ह बदलण्याचे काम मंजूर झाले आहे. जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्याचे काम बुधवार, दि. २५ आॅक्टोबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या दिवशी उजनी जलवाहिनीवर ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजता उजनीवरील पंप बंद करण्यात येतील. त्यानंतर जलवाहिनी रिकामी करून जागोजागी गळती असलेले सर्व व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दोन दिवसात हे काम पूर्ण करून पंप सुरू करण्यात येणार आहेत. या कामामुळे उजनी जलवाहिनी दोन दिवस बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत. बुधवारी उजनी जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या अवंतीनगर, उत्तर कसबा, साठे चाळ, मोटे वस्ती, काळी मशीद परिसर, इंदिरानगर, ईरण्णा वस्ती, भूषणनगर भाग: ३, राजीवनगर, रामलिंग सोसायटी, कोळी समाज सोसायटी, गरिबी हटाव झोपडपट्टी नं. २, आदित्यनगर, निर्मिती विहार, समतानगर, विजय देशमुखनगर, यतिमखाना या भागात पाणीपुरवठा होणार नाही. व्हॉल्व्ह जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर गुरुवारी रात्री उशिरा पंप सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने या भागाला पाणीपुरवठा करण्यात येईल. जलवाहिनी दोन दिवस बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे शहर व हद्दवाढ भागात बुधवारपासून आठवडाभर चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. ------------------२५ एअर व्हॉल्व्ह बदलणारया मोहिमेत जलवाहिनीवरील २५ एअर व्हॉल्व्ह, पंपहाऊसजवळील ओपन एक्सपाईन्सेन्स जॉर्इंट बदल्यात येणार आहेत. गुरुवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असून ठेकेदाराची पाच पथके कामासाठी तयार असल्याची माहिती मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली.