शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी सोमवार ; रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:39 IST

श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. 

ठळक मुद्देरेवणसिद्धेश्वरांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी पालखी सोहळा - १८९० साली श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची स्थापना

रेवणसिद्ध जवळेकरसोलापूर : दहाव्या शतकातच धर्मप्रसाराबरोबर जातीव्यवस्थेच्या विरोधात लोकांचे मत परिवर्तन करणाºया जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. 

आंध्र प्रदेशातील कोलिपाक येथील सोमेश्वर लिंगाच्या पोटातून एकोराम, मारुळाराध्य, रेवणसिद्धेश्वर, रेणुकाचार्य, पंडिताराध्य या पाच जगद्गुरुंचा जन्म झाल्याचा आणि त्याच लिंगात त्यांचा शेवट झाल्याची आख्यायिका आहे. श्री रेवणसिद्धेश्वर धर्मप्रसारासाठी, सामान्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी, समाजातील अस्थिरता दूर करण्यासाठी पालखीतूनच भारत भ्रमण करायचे. त्यांनी कधीही या भूमीवर पाय ठेवले नाही. कोेल्हापूर, मंगळवेढामार्गे श्री रेवणसिद्धेश्वर सोलापूरच्या नगरीत दाखल झाले.

इथे येताच त्यांनी भूमीवर पाय ठेवले. शिष्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी तो गुरु रेवणसिद्धेश्वरांना विचारलाच. ‘या भूमीत एका योगपुरुषाचा जन्म होणार आहे’, असे सांगत भूमीवर माती आपल्या कपाळी लावली. पुढे १२ व्या शतकात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म झाल्याचे पुराणात ऐकावयास आणि पुस्तकांमधून वाचावयास मिळते.

रेवणसिद्धेश्वरांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी पालखी सोहळा आणि रथोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. स्व. गंगाधर घटोळे, स्व. मलप्पा चिदरे, स्व. इरप्पा हिंगमिरे, स्व. सातप्पा दुलंगे, स्व. सिद्रामप्पा वळसंगे आदींच्या पुढाकारातून प्रथेला सुरुवात झाली. जोडभावी पेठेतील चिदरे वाड्यातून विधिवत पूजा करुन पालखी मिरवणुकीला प्रारंभ होतो. तेथून जुना अडत बाजार, कुंभारवेस, माणिक चौक, विजापूरवेस चौकमार्गे गुरुभेट येथे पालखी सोहळ्याचा विसावा घेतला जातो. तेथून ही मिरवणूक रंगभवन, सात रस्तामार्गे कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात येते. त्याच दिवशी सायंकाळी आलेल्या मार्गांनी मिरवणुकीची चिदरे वाड्यात सांगता होते.

अडत बाजार हलला... व्यापारी दुरावले !- पूर्वी अडत बाजार जोडभावी पेठेत भरायचा. १९७८ साली हा बाजार (मार्केट यार्ड) हैदराबाद रोडवर (सध्याचे मार्केट यार्ड) स्थलांतर झाला. त्याआधी अडत व्यापारी, विक्रेते, भुसार व्यापारी पालखी सोहळ्यात आवर्जून सहभागी व्हायचे. जसा अडत बाजार दूर गेला तसे भाविकही सोहळ्यापासून दुरावले गेले. 

रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची सेवा- १८९० साली श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची स्थापना झाली. ११८ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळास १९६८ साली मान्यता मिळाली. मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. सध्या मंडळाची धुरा इरसंगप्पा हिंगमिरे, गंगाधर यादवाड, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, केदार वारद आदींकडे आहे. 

पूर्वजांनी सुरु केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा पुढे नेत आहोत. श्रावणातल्या दर रविवारी मंडळाच्या वतीने अन्नदान केले जाते. युवा पिढी सोहळ्यात सामील व्हावी, अशी अपेक्षा आहे.-इरसंगप्पा हिंगमिरे, अध्यक्ष, रेवणसिद्धेश्वर यात्रा कमिटी

पालखी सोहळा आणि रथोत्सवात समाजातील युवकांचा सहभाग अधिक असावा. तो सहभाग वाढला तर पालखी सोहळा आणि रथोत्सवाला मोठे स्वरुप येईल.-राजेंद्र बिराजदार,व्यवस्थापक- रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळ

टॅग्स :Solapurसोलापूर