पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव हनुमंत झाडे (रा. नरखेड, ता. मोहोळ) हे दुकानाचे स्टेशनरी साहित्याची खरेदी करण्यासाठी मोहोळमार्गे पंढरपूरकडे निघाले होते. दरम्यान, दुपारी पेनूर गावाच्या शिवारात गोरक्षनाथ मंदिराजवळून दुचाकीवरून जाताना पाठीमागून दुचाकीवरून तिघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी दुकानदाराच्या गाडीला दुचाकी आडवी लावली. या पिशवीमध्ये काय घेऊन कुठे चालला आहेत, असे विचारले. त्यावेळेस झाडे यांनी पंढरपूर येथे चाललो असून, पिशवीमध्ये काहीही नाही असे सांगितले. त्यावेळी तिघांनी त्यांचे खिशे चापसण्यास सुरुवात केली. एकाने रोख ३८ हजार रुपये काढून घेतले, तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची १५ हजारांची सोनसाखळी हिसकावून काढली. त्यानंतर त्यांच्या गाडीची चावी लांब फेकून दिली. तिघेही एमएच १३ डीएल १३१५ या गाडीवरून मोहोळच्या दिशेने पलायन केले. या चोरीप्रकरणी नामदेव झाडे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मोहोळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पेनूरजवळ दुचाकी आडवी लावून दुकानदाराला ५३ हजारांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST