शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; स्वॅब टेस्ट दिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कामावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:46 IST

सोलापूर महापालिका आरोग्य केंद्रातील गलथान कारभार; अहवाल पॉझिटिव्ह येताच तो कर्मचारी क्वारंटाईन झाला

ठळक मुद्देमजरेवाडी आरोग्य केंद्रातील एका लिपिकाने चार दिवसांपूर्वी स्वॅब टेस्ट दिली होतीत्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत हा कर्मचारी आरोग्य केंद्रात काम करीत होतास्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगिल्यानंतर तो घरी गेला. हे वृत्त ऐकून इतर कर्मचारी धास्तावले

राकेश कदम 

सोलापूर : महापालिकेच्या मजरेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक लिपिक स्वॅब टेस्ट देऊन कामावर रुजू झाले. टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाºयांमध्ये खळबळ माजली. यामुळे आरोग्य केंद्र्रातील गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आल्याची चर्चा सुरू झाली.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वॅब टेस्ट दिल्यानंतर अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन होणे अपेक्षित असल्याचे मनपाकडून वारंवार सांगितले जाते. परंतु, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे संकेत पाळत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. टेस्ट दिल्यानंतर हे कर्मचारी सर्वत्र फिरत असतात. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईन होतात. याचा फटका इतर कर्मचाºयांना बसतो. हा प्रकार कमजोर प्रकृती असलेल्या कर्मचाºयांच्या जीवावर उठणारा असल्याची टीका नगरसेवकांकडून होत आहे.

मजरेवाडी आरोग्य केंद्रातील एका लिपिकाने चार दिवसांपूर्वी स्वॅब टेस्ट दिली होती. त्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत हा कर्मचारी आरोग्य केंद्रात काम करीत होता. स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगिल्यानंतर तो घरी गेला. हे वृत्त ऐकून इतर कर्मचारी धास्तावले. दुपारनंतर आरोग्य केंद्रातील इतर कामही बंद ठेवण्यात आले. मजरेवाडी आणि परिसरातील अनेक नागरिक गुरुवारी सकाळी या आरोग्य केंद्राजवळ आले. बरेच नागरिक सकाळी साडेदहापर्यंत या ठिकाणी थांबून होते. कोरोनाचा रुग्ण आढळल्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे आरोग्य केंद्र एक दिवस बंद ठेवले आहे, असा निरोप नागरिकांना देण्यात आला. त्यानंतर अनेक नागरिकही धास्तावल्याचे दिसून आले.

‘त्या’ कर्मचाºयाला का बोलावले ?- स्वॅब टेस्ट दिलेल्या कर्मचाºयाला कामावर बोलावणे योग्य नाही. कोरोनाचा रुग्ण आढळला म्हणून संपूर्ण आरोग्य केंद्र आणि फीवर ओपीडी बंद ठेवणे योग्य नाही. पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. मजरेवाडी आरोग्य केंद्रातील प्रकाराबाबत आरोग्य अधिकारी माहिती घेतील. याबद्दल निश्चित कार्यवाही होईल, असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.

आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाºयांची काळजी घेत नसल्याचे आम्ही वारंवार सांगतोय. एखाद्या कामगाराची कोरोना टेस्ट घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंत त्याला कामावर बोलावणे योग्य नाही. मजरेवाडी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी याबद्दल जागरुक राहणे गरजेचे होते. आयुक्तांनी यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करायला हवी.- अशोक जानराव, कामगार नेते, मनपा.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या