शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

धक्कादायक; वॉचमनच्या मुलाकडून सोलापुरात विवाहित महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:28 IST

होटगी रोडवरील मोहिते नगरातील घटना; सीसीटिव्ही कॅमेºयाच्या आधारे आरोपीला पकडण्यात पोलिसांना आले यश

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेºयातील फुटेजमध्ये आढळून आलेल्या व्यक्तीची चौकशी विजयकुमार स्वामी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीकामानिमित्त तो नागमणी स्वामी यांच्याकडे येत-जात होता

सोलापूर : होटगी रोडवरील मोहिते नगरात गंगाधर निवास या बंगल्यामध्ये राहण्यास असलेल्या महिलेचा खून करून तिचा मोबाईल घेऊन गेल्याप्रकरणी वॉचमनच्या मुलाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खळबळजनक प्रकार २७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. 

 सैफअली अश्रफ शेख (रा. कैकशा अपार्टमेंट, मोहिते नगरजवळ, होटगी रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागमणी गुरुपादय्या स्वामी (वय ४५) या गंगाधर निवास या बंगल्यामध्ये एकट्या राहत होत्या. दिनांक २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता नागमणी स्वामी यांचे भाऊ विजयकुमार गुरुपादय्या स्वामी (वय ४९, रा. विल्डवेज, बरनेर महालुंगी रोड, पुणे) यांनी त्यांना मोबाईलवरून फोन केला असता तो स्वीच आॅफ लागत होता. मोबाईल स्वीच आॅफ दाखवत असल्याने त्यांनी बंगल्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज स्वत:च्या मोबाईलवरून पाहण्याचा प्रयत्न केला मात्र तेही बंद दाखवत होते.

विजयकुमार स्वामी यांनी सोलापुरातील त्यांच्या मोठ्या बहिणीला फोन करून सांगितले की, नागमणी हिचा मोबाईल बंद लागत आहे. कोणालातरी बंगल्यावर पाठव आणि पाहावयास लाव, त्यामुळे मोठ्या बहिणीने आपल्या मुलाला गंगाधर निवास बंगला येथे पाठवले. ३० जून रोजी सकाळी साडेसात वाजता मुलगा बंगल्यात गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. बेडरुमचा दरवाजा अर्धवट उघडा होता, आतमध्ये नागमणी स्वामी या जमिनीवर पडल्या होत्या आणि दुर्गंधी पसरली होती. हा सर्व प्रकार बहिणीच्या मुलाने फिर्यादी विजयकुमार स्वामी यांना फोनवरून सांगितला. विजयकुमार स्वामी हे पुणे येथून सोलापुरात आले व त्यांनी बहीण नागमणी स्वामी यांचा अंत्यसंस्कार केला. त्यानंतर त्यांनी घरात सर्वत्र पाहणी केली असता नागमणी स्वामी यांचा मोबाईल कोठेही मिळून आला नाही. त्यानंतर त्यांनी बंगल्याला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासून पाहिले असता त्यामध्ये दिनांक २७ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एक इसम बंगल्यात लपत-छपत आल्याचे चित्रीकरण आढळून आले. 

सीसीटीव्ही कॅमेºयातील फुटेजमध्ये आढळून आलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता तो पाठीमागे असलेल्या कैकशा अपार्टमेंटमधील वॉचमनचा मुलगा असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी विजयकुमार स्वामी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत. 

तरुणाने बंगल्यात केलेला प्रवेश सीसीटीव्ही कॅमेºयात कैद२७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास एक व्यक्ती लपत छपत बंगल्याच्या वॉल कंपौंडवरून आतमध्ये गेली. त्याने घराच्या पाठीमागील दरवाजा वाजवला; मात्र नागमणी स्वामी यांनी दार उघडले नाही. त्यामुळे ती व्यक्ती काही वेळ बंगल्याच्या पाठीमागील भागात घुटमळली. त्यानंतर ती समोरच्या दाराकडे आली. समोरच्या मुख्य दारातून ती बंगल्याच्या आतमध्ये गेली. 

सैफअली शेख हा नागमणी स्वामी यांच्या ओळखीचा होता, तो सेंट्रिंगवर कामाला होता. बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या कैकशा अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करणाºया व्यक्तीचा मुलगा असून तो तिथेच राहत होता. कामानिमित्त तो नागमणी स्वामी यांच्याकडे येत-जात होता. त्याने खून कशासाठी केला याचा शोध सुरू आहे. हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे. 

टॅग्स :SolapurसोलापूरMurderखूनSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस