शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; बँकांच्या व्याजापोटी दरमहा दूध संघ मोजतोय १८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 13:09 IST

उत्पन्न कमी अन् खर्च अधिक; संकलन कमी असल्याचाही तोटा

ठळक मुद्देसंकलन होणाºया दुधाची विक्री कशी करायची हा प्रश्न सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासमोर आहे

सोलापूर : बँकांच्या कर्जाचे दरमहा १८ लाख रुपये व्याज तसेच इतर खर्चासाठीचा बोजा सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वाढत आहे. उत्पन्न कमी अन् खर्च अधिक यामुळे संघाचे आर्थिक गणित बिघडले आहे.

एकेकाळी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध संकलन प्रतिदिन चार लाख लिटरपेक्षा अधिक होत होते व हेच दूध महानंदमार्फत राज्यात पुरवठा होत होते. यामुळे संघ नफ्यात होता. केवळ दूध संघावर जिल्ह्यातील अनेकांचे राजकीय बस्तान बसले आहे. अनेक शेतकºयांची कुटुंबं गाईच्या दुधात स्थिरस्थावर झाली; मात्र यातून स्पर्धा व राजकीय नेत्यांनी खासगी संघ सुरू केले. गावपातळीवरील याच सहकारी दूध उत्पादक संस्था खासगी संघाला दूध पुरवठा करीत आहेत. या राजकीय नेत्यांच्या खासगी संघांचे दूध आता राज्यभरात पुरवठा होत आहे. यामुळे राज्यभरातील सहकारी दूध संघांच्या संकलनावर कमालीचा परिणाम झाला आहे. अशीच स्थिती सोलापूर जिल्हा दूध संघाची आहे.

संकलन होणाºया दुधाची विक्री कशी करायची हा प्रश्न सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासमोर आहे. पॅकिंगमधून होणारी विक्रीही खासगी संघांच्या स्पर्धेत कमी झाली. शासनाने दूध खरेदी दरासाठी काढलेले आदेश सहकारी संघाला पाळणे बंधनकारक आहे; मात्र खासगी संघ स्वत: दर ठरवितात. सोलापूर जिल्हा संघ प्रतिलिटर २५ रुपयाने व खासगी संघ हेच दूध १८-२० रुपयाने खरेदी करून विक्री करीत आहेत. असा प्रकार चार- पाच वर्षांपासून सुरू आहे. याचा परिणाम सोलापूर जिल्हा दूध संघाच्या उत्पन्नावर झाला आहे.जिल्हा संघाने एचडीएफसी बँकेचे २० कोटी व मनोरमा बँकेचे एक कोटी रुपये कर्ज काढले आहे. याचे दरमहा १८ लाख रुपये व्याज भरावे लागते. याशिवाय नियमित खर्च व इतर बोजा पडत आहे. उत्पन्न कमी अन् खर्च अधिक अशी स्थिती असल्याने जिल्हा संघ अधिक तोट्यात जात आहे.

अनुदान योजनेमुळे संकट शासनाचे आदेश सहकारीप्रमाणे खासगी संघांसाठी बंधनकारक पाहिजे असे दूध संघांच्या ज्येष्ठ संचालकाने सांगितले. आम्हाला २५ रुपयाने दूध खरेदी करण्यास बंधनकारक करायचे व खासगी संघांनी त्यांना पाहिजे तो दर द्यायचा हे राज्यात सुरू आहे. अनुदान योजना सुरू करायची; मात्र अनुदानाची रक्कम वेळेवर द्यायची नाही. याचा फटका बसत असल्याचे ज्येष्ठ संचालकाने सांगितले.

शासनाचे दूध धोरण दूध संकलन करणाºया प्रत्येकासाठी समान हवे. तरच सहकारी संघ टिकणार आहेत. सोलापूर जिल्हा संघाचे संकलन प्रतिदिन दोन लाख लिटर झाले व महानंदने हे दूध खरेदी केले तरच संघ व शेतकरी टिकणार आहेत. शासनाने शेतकरी समोर ठेवून दूध धोरण ठरवावे. - राजेंद्रसिंह राजे-भोसले, संचालक, सोलापूर दूध संघ 

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठा