शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur | धक्कादायक! उड्डाणपुलावरून उडी मारलेल्या काळविटांच्या मृत्यूचा आकडा १४ वर

By appasaheb.patil | Updated: January 31, 2023 15:38 IST

एकमेव शिल्लक काळवीट उपचारासाठी पुण्याला हलविणार

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : पुणे-विजापूर बायपास रोडवरील सोलापूरनजीक देशमुख पाटील वस्ती नजीक अपघातात तीन जखमी काळवीटा पैकी दुसऱ्या काळविटाचा सोमवारी मृत्यू झाला .शिल्लक राहिलेले एकमेव काळवीट उपचारासाठी पुण्याला हलविण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी दीपक खलानी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले .

सोलापूरच्या सिद्धेश्वर वनविहारातील रेस्क्यू सेंटर मध्ये चोवीस तास वैद्यकीय सेवा देण्याची सुविधा नसल्याने सध्या डॉक्टरांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.  एकमेव जखमी काळविटांला वाचविण्यासाठी पुण्यातील बवधनच्या रेस्क्यू सेंटर ला हलविण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्याहून रेस्क्यू टीम  सोलापूरात दाखल झाली असून ते सध्या गव्याच्या शोध घेण्यासाठी डोंणगाव, बेलाटी,देगाव,पाथरी परिसरात भटकंती करीत आहेत. ते लवकरच या जखमी काळवीटास पुण्याला घेऊन जाणार आहेत.

प्रवीणसिंह परदेशी यांनी केली घटनास्थळाची पाहणी

देशमुख पाटील वस्तीजवळील भुयारी पुलावर उड्या मारून ठार झालेली १२ काळवीटे आणि उपचारादरम्यान दगावलेली दोन काळवीटे या दुर्घटनेची गंभीर दखल घेत अपघात स्थळी संरक्षण जाळी बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे . अपघातस्थळाची  महाराष्ट्र राज्य नीती आयोगाचे अध्यक्ष व वन्यजीव प्रेमी प्रवीणसिंह परदेशी हे सोलापूर भेटीत अपघातस्थळाची रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गाचे  अधिकारी संजय कदम, महेश येमुल, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील , नेचर काँझर्वेशन चे पप्पू जमादार, आदित्य घाडगे, प्रसाद बोलदे यांच्या समवेत पाहणी केली.

अपघात स्थळी तीन फुटांची जाळी बसविणार...

वनविभाग  व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला  तत्परतेने जाळी बसविण्याची सूचना केली. अभ्यासगट स्थापन करून कायमचा तोडगा काढण्यात यावा असे त्यांनी सांगितले .वनविभागाकडून जाळी बसविण्याचे रेखांकन निश्चित करण्यात आले असून महामार्ग विभागाकडे सोपविण्यात आले. काळविटांच्या नेहमी ज्या ठिकाणाहून स्थलांतर करतात अश्या ठिकाणी तीन मीटर उंचीचे जाळ्या बसविण्यात येणार आहेत. लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर