शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांना पुन्हा ‘शॉक’; सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 14:59 IST

उन्हाळी पिके धोक्यात; महावितरणने बनविले गावनिहाय वेळापत्रक

सोलापूर : विजेच्या मागणीत पुरवठा कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत तीन तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीपंपाला बसत आहे. विजेअभावी पाणी देता येत नसल्याने उन्हाळी पिके धोक्यात येत आहेत. महावितरणने भारनियमनासाठी गावनिहाय वेळापत्रक बनविले आहे. मात्र याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.

सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात उन्हाच्या झळा हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. सोलापूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, लवकरच ४४ अंशाच्या पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरू आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येदेखील कोळशाच्या टंचाईमुळे विजेच्या उपलब्धतेमध्ये तूट निर्माण झाली होती. सध्या कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक प्रकल्पांमधून प्राप्त होणाऱ्या विजेमध्ये २०००-३००० मेगावॉटपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे.

----------

६ ते १० वाजेपर्यंत काटकसरीने वीज वापरा

उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी यापुढे २५ हजार मेगावॉटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सर्वच ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यात समतोल राखण्यासाठी विशेषतः सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

--------

अधिकारी फोन उचलेनात...

भारनियमनाबाबत माहिती विचारण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी महावितरण सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. त्यामुळे कोणत्या तालुक्यात किती वेळेचे भारनियमन सुरू आहे याविषयीची माहिती समजू शकली नाही.

--------

फोर्स लोडशेडिंगच्या नावाखाली वीज बंद...

मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा कमी होत असेल तर महावितरण फोर्स लोडशेडिंगच्या नावाखाली गावागावातील वीजपुरवठा तीन ते चार तास बंद करते. रोहित्रांवर भार येऊ नये, विद्युत केंद्रात बिघाड होऊ नये यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेती