शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यावरून सेना - भाजपाच गदारोळ, उमेदवारी अर्ज भरण्यापासून भाजपाला शिवसेनेने रोखले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 14:17 IST

गोंधळानंतर नगरसचिव प्रविण दंतकाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला मात्र त्यावर अनुमोदक म्हणून कोणाचीच सही नाही़ त्यामुळे छाननीत या अर्जाचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ, संतोष भोसले व इतर दोन सदस्य दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरसचिव कार्यालयात आले होते मात्र त्याचवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज एका कार्यकर्त्यांने पळवून नेला

ठळक मुद्देसोलापूर महापालिका स्थायी सभापती निवडीत भाजपाच्या गटबाजीचा पुन्हा दणकाप्रदेश भाजपातर्फे राजश्री कणके यांचे नाव आलेले असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे सहा सदस्यीय शेवटच्या क्षणापर्यंत न आल्याने भाजपाची उमेदवारी दाखल होण्याची गोची भाजपामधील गोंधळाचा तिसºयाला फायदा झाल्याचे स्पष्ट

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : सोलापूर महापालिका स्थायी सभापती निवडीत भाजपाच्या गटबाजीचा पुन्हा दणका बसला़ प्रदेश भाजपातर्फे राजश्री कणके यांचे नाव आलेले असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे सहा सदस्यीय शेवटच्या क्षणापर्यंत न आल्याने भाजपाची उमेदवारी दाखल होण्याची गोची झाली़ शेवटचा एक मिनिट उरलेला असताना महापौर शोभा बनशेट्टी, संजय कोळी व भाजपाचे इतर पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी नगरसचिव कार्यालयात आले पण वेळ संपलेली आहे असे सांगून शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण व इतर पदाधिकाºयांनी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखले़ संजय कोळी अजून वेळ आहे असे म्हणत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यास प्रखर आक्षेप नगरसचिवांपर्यंत जाण्यास रोखले़ सुमारे पाच मिनिटे नगरसचिव कार्यालयात शिवसेना-भाजप पदाधिकाºयांत हमरीतुमरी झाली़ शेवटी नाईलास्तव महापौर शोभा बनशेट्टी, उमेदवार राजश्री कणके, संजय कोळी व इतर कार्यकर्ते बाहेर पडले़ वेळ संपली तेव्हा स्थायी सभापती पदासाठी एकमेव उमेदवार गणेश वानकर यांचा एकच अर्ज आला आहे़ त्यामुळे भाजप गटबाजीत स्थायी सभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ या गोंधळानंतर भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी व इतर पदाधिकारी यांची फोनाफोनी सुरू होती़ या गोंधळाबाबत त्यांची काय भूमिका असणार याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही़.

भाजपामधील गोंधळाचा तिसºयाला फायदा .......गोंधळानंतर नगरसचिव प्रविण दंतकाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला मात्र त्यावर अनुमोदक म्हणून कोणाचीच सही नाही़ त्यामुळे छाननीत या अर्जाचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ, संतोष भोसले व इतर दोन सदस्य दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरसचिव कार्यालयात आले होते मात्र त्याचवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज एका कार्यकर्त्यांने पळवून नेला त्यामुळे संतापून ते चौघे नगरसेवक निघून गेले़ भाजपाचे उमेदवार कणके अनुमोदकच्या प्रतिक्षेतच राहिल्या दरम्यान, विरोधी गटाचे सदस्य नगरसचिव कार्यालयात आले पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही़ त्यामुळे भाजपामधील गोंधळाचा तिसºयाला फायदा झाल्याचे स्पष्ट झाले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका