शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिवसेना जे बोलते ते करतेच : अदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 11:51 IST

मोहोळ येथील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन

ठळक मुद्देमोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक २  पोखरापूर या  कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरणनागरिकांनी आपापल्या भागातील अडचणींची निवेदने ठाकरे यांना दिली

मोहोळ : शेतकºयांना कसलीही अडचण असेल तरी त्यांनी शिवसेनेचा विचार डोक्यात आणावा.  शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. शिवसेना जे बोलते ते करते. पुढच्या सहा महिन्यात या योजनेचे पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला आपणच येणार असल्याचा आत्मविश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक २  पोखरापूर या  कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपापल्या भागातील अडचणींची निवेदने ठाकरे यांना दिली.

यावेळी व्यासपीठावर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंधारण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत, आ.नारायण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पृथ्वीराज सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, जिल्हा उपप्रमुख चरण चवरे, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराब ढोबळे, साईनाथ अभंगराव, लक्ष्मीकांत ठोंगे, महेश कोठे, शहाजीबापू पाटील, संभाजी शिंदे, तालुका उपप्रमुख नागेश वनकळसे, दादासाहेब पवार, काका देशमुख, नागनाथ क्षीरसागर, सत्यवान देशमुख, सीमा पाटील, अंजली काटकर,  शैला गोडसे, जयश्री गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे उपस्थित होते. 

शिवतारे म्हणाले, १९९७ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मंजूर झालेली ही योजना होती. मध्यंतरी चुकीचे सरकार आल्याने रेंगाळली होती. आता आपल्या विचाराचं सरकार असल्याने पोखरापूरच्या टप्पा क्रमांक २ च्या कामाचे उद्घाटन ठाकरेंची तिसरी पिढी करेल. आदित्य ठाकरे यांना शेतकºयांच्या  डोळ्यातील अश्रू कळतात. केवळ शेतकºयांच्या कामासाठी आदित्य ठाकरे मंत्रालयात माझ्याकडे आले. त्यामुळेच कामाला वेग आला. वीस वर्षे रखडलेले काम केवळ एका आठवड्यात मार्गी लागले. आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी द्या असे आवाहन शिवतारे यांनी केले. 

याप्रसंगी संजय क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर,  बाळासाहेब भोसले, सुशील क्षीरसागर, बाळासाहेब वाघमोडे, शहरप्रमुख विकी देशमुख, शंकर वाघमारे, उद्योजक अर्जुन वाघमारे, संजीव खिलारे, प्रभाकर देशमुख, पुष्कराज पाटील, अतुल गावडे, अमित वाघमारे, राम कोरके, सुधीर गोरे, राजरत्न गायकवाड, यांच्यासह  विविध तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता जयंत शिंदे, विलास रजपूत, खलील अन्सारी, धीरज साळे हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गणेश वानकर व तालुक्याच्या सर्व पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. 

२० वर्षांपासून पाहतोय वाट..मुंबईतील पावसामुळे मला येण्यास उशीर झाला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे आदित्य ठाकरे बोलताच उपस्थित शेतकरी वर्गातून आवाज आला. आम्ही २० वर्षे या कामासाठी आतुरतेने वाट पाहात होतो. ते काम तुम्ही केले. तुम्ही कितीही उशिरा आला असता तरी आम्ही जागा सोडणार नव्हतो.

टॅग्स :SolapurसोलापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेElectionनिवडणूकPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना