शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ती उशीरा आली, आग्रहाखातर नाचली; दबंग गर्लसाठी उन्हात ताटकळले चाहते

By काशिनाथ वाघमारे | Updated: October 7, 2023 16:54 IST

एका चाहत्याने जाता-जाता तिला बुके दिला तर दुस-या चाहत्याला तिने ऑटोग्राफही देत सोलापूरकरांबद्दल आदर व्यक्त केला.

सोलापूर : हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री, दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही एका ज्वेलरी दालनाच्या उदघाटनासाठी सोलापुरात येत असल्याचे समजताच तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी ऊन झेलत रस्त्यावर गर्दी केली. ब-याच वेळेनंतर तिचे आगमन झाले आणि चाहत्यांमधली उत्सुकता पाहून ती गाण्यावर नाचली. एका चाहत्याने जाता-जाता तिला बुके दिला तर दुस-या चाहत्याला तिने ऑटोग्राफही देत सोलापूरकरांबद्दल आदर व्यक्त केला.

सोलापूर शहरात व्हीआयपी रोडवर एका नव्या ज्वेलरी दालनाच्या उदघाटनासाठी सोनाक्षी सिन्हा शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी सोलापुरात येत असल्याची वार्ता महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये पसरली. ज्वेलरी दालनाच्या उदघाटनाची वेळ सकाळी ११.३० होती. दहा वाजल्या पासून चाहते या दालनाबाहेर जमायला लागले. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला. दालनाच्या आवरातील सुरक्षेसाठी बाऊन्सरही नेमले. ती दुपारी सव्वा एक वाजता आली.चात्यांची गर्दी पाहून ती भारावून गेली. निवेदिकासह चाहत्यांनी केलेल्या आग्रहानंतर तिने 'साडी के फॉल पे..' या गाण्यावर दोन मिनीटे नाचली.  निवेदीकेने उत्सुकता ताणली..ताटकळत थांबलेल्या चाहत्यांमध्ये उत्सुकता टिकून ठेवण्यासाठी निवेदिकेने तरुणांशी माइकवरून गप्पा मारल्या. सोनाक्षीचा पहिला चित्रपट कोणता ? वडिलांचे नाव काय? त्यांचा फेमस डायलॉग कोणता? असे अनेक प्रश्न करून उत्सुकता ताणून नेली. विश्वसनीय सूत्रानुसार ती आत्ताच प्लेनने निघाली असल्याचे सांगत उत्सुक्ता ताणली.  निवेदीकेने सोनाक्षीच्या गाण्यावर कोणाला डान्स करायचा आहे का ? प्रश्न करताच एक तरुणी पुढे आली. मंचावर येऊन तिने लुंगी डांस.. लुंगी डांस.. या गाण्यावर नृत्य केले

टॅग्स :Solapurसोलापूर