शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शशिकला यांना सोलापुरातच मिळाले अभिनयाचे बाळकडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 03:14 IST

चित्रपटसृष्टीसह सोलापुरातील कलाक्षेत्रावरही शोककळा

सोलापूर : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी निधन झाले. त्या मूळच्या सोलापूरच्या. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह सोलापुरातील कलाक्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला आनंदराव जवळकर. आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. शशिकला यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. असं असलं तरी त्यांचं बालपण मात्र सुखवस्तू घरात गेलं होतं. त्यांच्या वडिलांचा उद्योग होता. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती.वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ही देखणी अभिनेत्री नृत्य, गायन व अभिनय करू लागली. सोलापुरातील श्रद्धानंद समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसे जिंकली. काही काळानंतर त्यांचे वडील आनंदराव यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांचे  कुटुंब सोलापूर सोडून मुंबई येथे गेले. वयाच्या विसाव्या वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.सोलापूरला शेवटची भेटशशिकला यांची सोलापूरची शेवटची भेट साधारणतः २००७-०८ सालची असावी. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी शशिकला आल्या होत्या. प्रकाश यलगुलवार यांच्या मूकबधिर शाळेत रात्री भोजनासाठी त्या आल्या असता त्यांची भेट झाल्याचे नाट्यप्रेमी प्रशांत बडवे यांनी सांगितले.शुक्रवार पेठेत घर : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे घर शुक्रवार पेठेत आजही सुस्थितीत आहे. १९८३ मध्ये शशिकला यांचे भाचे मोहन जवळकर यांच्याकडून दिनेश कालेकर यांनी ते विकत घेतले. कालेकर कुटुंबीय शशिकला यांच्या घरामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या या जुन्या घरामध्ये थोडासा बदल केला असला तरी आजही हे घर शशिकला यांच्यामुळे परिसरात ओळखले जाते.