शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं! शरद पवारांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:58 IST

शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे.

कुर्डूवाडी (ता़माढा, जि़सोलापूर) - शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे. मी कृषीमंत्री असताना फळबागा लावा, आंब्याची झाडे लावा असे म्हणत होतो. आता आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं, असा मिश्कील टोला खा. शरद पवार यांनी भिडे गुरुजी यांना टोला लगावला.येथील के. एन. भिसे महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. पवार यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार विनायकराव पाटील यांचा सत्कारही करण्यात आला.बळीराजा जागृत अन् संघटीत झाला पाहिजे. शेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही, अशी टीका पवार यांनी केली.संभाजी भिडेंना वाचविण्यासाठी ‘एल्गार’च्या बदनामीचा डावमुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील दंगलीमागील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करून एल्गार परिषदेला बदनाम केले जात आहे. या अन्यायी कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेण्याबरोबरच मोदी, शहा सरकारविरोधात देशभरातील जनतेला संघटित केले जाईल, असा इशारा निवृत्त न्या. बी.जी. कोळसे-पाटील यांनी मंगळवारी दिला. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी सुधीर धवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, रोना विल्सन व महेश राऊत या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्याच्या निषेधार्थ निवृत्ती न्या. कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘दंगलीतील खरे सूत्रधार असलेल्या भिडे यांच्या अटकेसाठी बहुजनांची अनेक आंदोलने होऊनही पोलीस कारवाई करीत नाहीत.‘आंबा थिअरी’च्या चौकशीचे आरोग्य संचालकांचे आदेशनाशिक : शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या मूल होण्यासाठी माझ्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याच्या दाव्याची चौकशी करण्याचे आदेश पुण्यातील आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकेस दिले आहेत. रविवारी वडांगळीकर मठ येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील १८० पेक्षा जास्त आंबे दीडशे जणांना खायला दिले, त्यांना मुलेच झाली, तसेच ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असे विधान केले होते. त्यावर पडसाद उमटले. गणेश बोºहाडे यांनी ‘आंबा थिअरी’विरोधात तक्रार केली होती.

 

आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं! 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी