नारायण चव्हाणसोलापूर दि २३ : सीना नदीला आलेल्या महापुरात दोन वर्षांपूर्वी वाहून गेलेला बंदलगी बंधारा आता राजकीय पर्यटनस्थळ बनला असून दुरुस्ती, निधीची तरतूद या बाबी मागे पडून राजक ीय नेत्यांनी दिलेल्या भेटीमुळे हा बंधारा अधिक चर्चेत राहिला़ पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांमध्ये मात्र या प्रकाराने संतापाची भावना मूळ धरु लागली आहे़ आॅगस्ट २०१६ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात बंदलगी बंधारा मधोमध वाहून गेला़ बंधाºयाचे चार दरवाजे वाहून गेल्याने या बंधाºयात गेल्या दोन वर्षांत पाण्याचा टिपूसही राहू शकला नाही़ बंधाºयात पाणीसाठा होऊ शकला नाही़ त्यामुळे त्यावर अवलंबून असलेली हजारो एकरावरील पिके नष्ट झाली आहेत़ उसाचे क्षेत्र कमी झाले आहे़ उद्ध्वस्त झालेल्या बंधाºयाच्या मुद्यावरुन दक्षिण सोलापूरच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत़ भाजपाचे खासदार अॅड़ शरद बनसोडे यांनी सर्वात आधी बंदलगी बंधाºयाला भेट दिली़ त्यांच्या भेटीने सुखावलेल्या शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या़ बंधाºयाऐवजी बॅरेजेस बांधण्याचा प्रस्ताव देण्याचे अभिवचन खा़ बनसोडे यांनी दिले़ भाजपांतर्गत गटबाजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना शह देण्यासाठी खासदारांनी या प्रकरणी लक्ष घातल्याची चर्चा झाली़ पण प्रस्तावाचे गाडे कुठे अडले हे कळले नाही़ मग शेतकºयांनी पालकमंत्र्यांसमोर गाºहाणे मांडले़ त्यांनी अधिकाºयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलून बंधाºयाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनीही दिले; मात्र बंधाºयाला भेट देण्याची कार्यकर्त्यांची मागणी त्यांनी कानामागे टाकली़ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदलगी बंधाºयाचा प्रश्न अधिक चिघळला़ सहकारमंत्री सुभाष देशमुखांना थेट विरोध करण्यासाठी बंधाºयाचे रणभूमीत रुपांतर झाले़ राष्ट्रवादीचे आप्पाराव कोरे, रासपाचे विजय हत्तुरे, सेनेचे अमर पाटील यांनी पाहणी दौºयाचे आयोजन करीत शेतकºयांच्या असंतोषाला वाट करुन दिली़ भाजपाचा नाराज गट आपले उपद्रवमूल्य वाढवण्यासाठी विरोधी गटाला सतत प्रोत्साहित करीत राहिल्याने सहकारमंत्र्यांची डोकेदुखी वाढली़ जि. प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, भाजपाचे माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांनी बंदलगी बंधाºयाला भेट देऊन फोटोसेशन के ले़ आलेल्या पाहुण्यांच्या समोर आपली व्यथा मांडत शेतकरी मोठ्या आशा बाळगून राहिले़ दरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ काम लवकर सुरु करू असे सांगत कार्यकर्त्यांची समजूत घालत राहिले, परंतु त्यांनी बंधाºयाला भेट देण्याचे कटाक्षाने टाळले़ रविवारी शेतकºयांनी अचानकपणे बंधाºयाखाली मांडव घालून उपोषण सुरु केले़ काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन दिवसभर बैठक मारली़ शेतकºयांच्या प्रश्नावर एकत्र येऊन दिलेली त्यांची ही पहिलीच भेट़ सेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनीही या बंधाºयावर पायधूळ झाडली़ साहजिकच शेतकºयांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत़ ------------------बेसुमार वाळू उपसा- बंदलगी बंधारा कोरडा पडल्याने येथील नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरश: धुडगूस घातला़ गेल्या दोन वर्षांत सीना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे़
सोलापूर जिल्ह्यातील बंदलगी बंधारा बनला राजकीय पर्यटनस्थळ, पाण्याविना हाल, शेतकºयांमध्ये मात्र संतापाची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:35 IST
सीना नदीला आलेल्या महापुरात दोन वर्षांपूर्वी वाहून गेलेला बंदलगी बंधारा आता राजकीय पर्यटनस्थळ बनला असून दुरुस्ती, निधीची तरतूद या बाबी मागे पडून राजक ीय नेत्यांनी दिलेल्या भेटीमुळे हा बंधारा अधिक चर्चेत राहिला़ पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांमध्ये मात्र या प्रकाराने संतापाची भावना मूळ धरु लागली आहे़
सोलापूर जिल्ह्यातील बंदलगी बंधारा बनला राजकीय पर्यटनस्थळ, पाण्याविना हाल, शेतकºयांमध्ये मात्र संतापाची भावना
ठळक मुद्देआॅगस्ट २०१६ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात बंदलगी बंधारा मधोमध वाहून गेला़ बंधाºयाचे चार दरवाजे वाहून गेल्याने या बंधाºयात गेल्या दोन वर्षांत पाण्याचा टिपूसही राहू शकला नाही़ बंधाºयात पाणीसाठा होऊ शकला नाही़ त्यामुळे त्यावर अवलंबून असलेली हजारो एकरावरील पिके नष्ट झालीबंदलगी बंधारा कोरडा पडल्याने येथील नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरश: धुडगूस घातला़