शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार ?

By appasaheb.patil | Updated: June 15, 2019 15:23 IST

उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार; आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहºयांना मिळणार संधी

ठळक मुद्दे- माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील याच्यादेखील नावाची चर्चा- तानाजी सावंत वाशिममधून विधानपरिषदेचे सदस्य आहेत- सावंत हे सध्या सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून यशस्वी भूमिका पार पाडत आहेत 

सोलापूर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवार १६ जून रोजी होणार हे नक्की झाले असून, सकाळी ११ वाजता नवे मंत्री शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तानाजी सावंत हे यवतमाळ वाशीममधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा परंडा येथे साखर कारखाना आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवासी आहेत. सध्या सावंत हे सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. उद्या होणा-या मंत्रिमंडळ विस्तारामुळे मंत्रालयात त्यासंबंधींची तयारी सुरू करण्यात आली आहे. या तयारीमुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे सर्वसामान्य जनतेलाही या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल उत्सुकता आहे.

राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होत असून, त्यात अनेक नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह काही राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मंत्रिपदी वर्णी लागू शकते, असे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजत आहे. याशिवाय आशिष शेलार, औरंगाबादचे आमदार अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, संजय कुटे, डॉक्टर अनिल बोंडे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यास भाजपा उत्सुक असून त्याबद्दलचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. रिपाइं (आठवले गट) तर्फे अविनाश महातेकर यांचा समावेश होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री व रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे नाव पाठविल्याचे समजत आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार