शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST

पंढरपूर येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद‌्घाटनाप्रसंगी प्रा. शिवाजी सावंत बोलत होते. यावेळी सावंत ...

पंढरपूर येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद‌्घाटनाप्रसंगी प्रा. शिवाजी सावंत बोलत होते. यावेळी सावंत यांनी आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा रिक्त झाली आहे. यापूर्वी त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा होता. मात्र पुन्हा युती झाली, ती जागा भाजपकडे गेली. भाजपने ती जागा मित्र पक्षाला दिली. त्यामुळे आम्ही आघाडीचा धर्म पाळत दोन पावले मागे घेतली होती. सध्या राज्यात आघाडीचे तीन पक्षांचे सरकार आहे. वेळ कधी बदलेल, काय सांगता येत नाही. पक्ष नेतृत्वाने स्वबळावर लढा, असा आदेश दिल्यास सर्वसामान्य शिवसैनिक तयारच असेल, असेही सावंत यांनी सांगितले.

शैला गोडसे यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष घराघरांत जाऊन वाढविला. त्यांना निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मिळणे गरजेचे असतानाही त्यावेळी त्यांच्यावर अन्याय झाला. आता ही जागा राष्ट्रवादीची असली तरी शिवसेनेने निवडणूक लढवायची तयारी ठेवावी, असेही शिवाजी सावंत म्हणाले.

यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, भैरवनाथचे उपाध्यक्ष अनिल सावंत, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवींद्र मुळे, ग्राहक संरक्षक जिल्हाप्रमुख जयवंत माने, अरुण कोळी, शहर महिला आघाडी प्रमुख पूर्वा पांढरे, उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे, नाना सावतराव, तानाजी मोरे, पंकज डांगे, सिद्धेश्वर कोरे, विनोद कदम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

(वा.प्र.)

फोटो ओळी :::::::::::::::::::::::::

संपर्क कार्यालयाचे उद‌्घाटन करताना शिवेसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, साईनाथ अभंगराव, शैला गोडसे, रवींद्र मुळे, जयवंत माने आदी.