शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर फूट उंचीवर मांजात फसलेल्या पारव्याला अग्निशामक जवानांच्या मदतीने केले मुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:59 IST

सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ परिसरातील घटना; पक्षीमित्रांनीही दिली साथ, पक्षी झेप घेताच आनंद व्यक्त

ठळक मुद्दे- सिद्धेश्वर पेठ परिसरातील यशोधरा रुग्णालय परिसरातील घटना-सत्तर फूट उंचीवर मांजात फसलेल्या पारव्याला मिळाले जीवदान- पक्षीमित्रांनीही दिली साथ, अग्निशामक दलाच्या जवानांनी केली मदत

सोलापूर : घराच्यावर सारखा आवाज का येतोय हे पाहण्यासाठी जाफर बांगी आले. घराच्या पत्र्यावर त्यांना  मुस्तकीम शेख  हा पंधरावर्षीय मुलगा निदर्शनास आला. सत्तर फूट उंच अडकलेल्या पारवा पक्ष्याला वाचविण्यासाठी तो धडपडत होता. त्याच्या प्रयत्नाला अग्निशामक दल आणि पक्षीमित्रांची जोड मिळाली अन् काही वेळात पारव्याने आकाशात झेप घेतली.

ही घटना आहे सिद्धेश्वर पेठ परिसरातील यशोधरा रुग्णालय परिसरातील़ त्याचे असे झाले, शनिवारी पाडवा सणाची सर्वत्र तयारीची लगबग होती. अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या पूजेची तयारी सुरु होती. इतक्यात अग्निशामक दलाचा फोन खणखणला. ‘हॅलो़..मी जाफर बांगी बोलतोय.. बेगमपेठमध्ये यशोधरा हॉस्पिटलसमोरील रोडवर एक उंच तारेत मांजामध्ये  पारवा पक्षी अडकला आहे’ हा संवाद ऐकताच अग्निशामक दलाच्या जवानांनी नववर्षाची पूजा थोडावेळ पुढे ढकलून दलाचे सहायक अच्युत दुधाळ, फायरमन नेताजी दराडे, नीलेश माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला सोडवताच साखरपाणी देण्यात आले. सुदैवाने त्याला कुठेही जखम झाली नव्हती. त्यानंतर तत्काळ निसर्गात सोडण्यात आले. पारव्याने क्षणात  नववर्षाचे नवजीवन जगण्यासाठी निसर्गात झेप घेतली़

डोळे मिचकावत पारव्याने दिली स्माईल- पारवा जखमी झाला असेल त्यावर तत्काळ  उपचार व्हावेत असा विचार करुन निघत असताना अग्निशमन दलाने वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य प्रवीण जेऊरे आणि पक्षीमित्र मुकुं द  शेटे यांना फोनवरुन या घटनेची माहिती दिली. टीम घटनास्थळी दाखल झाली. केबल तारेला पतंगाचा मांजा अडकला होता. त्याचे दोन्ही पाय त्यात फसले होते़ तो उलटा लटकलेल्या अवस्थेत होता. बाजूच्या उंच इमारतीवर अग्निशमन टीमसह  काशीद हत्तुरे, जावेद बांगी, शौकीब शेख, तन्वीर बांगी पोहोचले़ मुस्तकीम शेख हापण मागे-मागे मदतीला आलाच. त्याने सोबत लांब दोरी आणली होती. दोरीला दगड बांधून लोंबकळणाºया मांजामध्ये अचूकपणे अडकावले. सावकाश स्वत:कडे खेचले. पारवा हातात येताच त्याच्या अंगावर फसलेला सर्व मांजा काढण्यात आला. संकटातून सुटका झाल्याची त्याला जाणीव झाली. डोळे मिचकावत या पारव्यानेदेखील एक स्माईल दिली. त्यानंतर त्याने निसर्गात भरारी घेतली़

टॅग्स :Solapurसोलापूर