शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वाहनधारकांना लुटणाºया सात दरोडेखोरांना सोलापूर पोलीसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 16:26 IST

सोलापूर :   सोलापूर हैद्राबाद महामार्गावर ट्रक अडवुन पैसे लुटणाºया चार जिल्ह्यातील सात दरोडेखोरांना सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देसोलापूर तालुका पोलिसांनी केली अटक

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर :   सोलापूर हैद्राबाद महामार्गावर ट्रक अडवुन पैसे लुटणाºया चार जिल्ह्यातील सात दरोडेखोरांना सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. कादीर अहमद शफीउल्ला खान  (वय ४५,रा.मुंब्रा.जि. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २ आॅगस्ट रोजी खान हे बारामती येथील डायना मिल्क कंपनीतुन खाद्य पदार्थ भरुन (एमएच ४५ एआर ५४५२ )या क्रमांकाच्या ट्रक मधुन  घेवुन जात होते.  सोलापूर हैद्राबाद रोडवर  तांदुळवाडी शिवारात अज्ञात दरोडे खोरांनी ट्रक थांबवुन फिर्यादीस मारहाण करुन त्यांच्याकडी ४५ हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल असा एकुण ५२ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सुरज नवनाथ मुंडे (वय २०,रा. उपळाई.ता.कळंब), किशोर सुनिल भोई (वय २४,रा.कळाशी.ता.इंदापूर ), रोहित नवनाथ शिंदे (वय १९,रा.कळाशी.ता.इंदापूर ), योगेश रामलींग ढाकणे (वय २०,रा.कोरेगाव.ता.बार्शी), परशुराम हरिश्चंद्र ढाकणे (वय २१,रा.कोरेगाव.ता.बार्शी), अमोल शंकर खताळ (वय २५,रा.मोरेवस्ती.ता.जामखेड),  उमेश दगडू देवकते (रा.करमाळा रोड, कुर्डवाडी.ता.माढा) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी तपास केला असता, नळदुर्ग व उस्मानाबाद हद्दीत आरोपीनी ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेत होते.  उस्मानाबाद पोलीसांनी आरोपींनी अटक केली होती. तालुका पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांशी संपर्क करुन आरोपीना ताब्यात घेवुन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच नळदुर्ग पोलीस ठाणे, उस्मानाबाद पोलीस ठाणे व सोलापूर तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आरोपीनी एकाच दिवशी तीन दरोडे टाकले होते. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.पोलीस अधिक्षक विरेश प्रभु , अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे तपास करत आहेत.