शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पडगानूर, कंदकुरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:51 IST

सोलापूरच्या परिवहन समितीत ठराव; शाळा सुरू होण्याच्या तोंडावर बसचे नियोजन चुकले

ठळक मुद्देपरिवहन समितीची सभा सभापती गणेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालीसभेत विजय पुकाळे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा झालीचेसी क्रॅक बसप्रकरणी लवादाने दिलेल्या निकालाविरूद्ध अपील करण्यासाठी अ‍ॅड. विजय मराठे यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली

सोलापूर : एसएमटीच्या बस फेºयाच्या नियोजनात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मुख्य वाहतूक निरीक्षक भरत कंदकुरे आणि कार्यशाळा व्यवस्थापक एम. एस. पडगानूर या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय महापालिका परिवहन समितीच्या सभेत घेण्यात आला. 

परिवहन समितीची सभा सभापती गणेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत विजय पुकाळे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. महापालिका परिवहन उपक्रमाकडील बससंख्या कमी होत चालली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना अडचणी येत आहेत. रिक्षातून जादा भाडे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. आता लवकरच शाळा सुरू होणार आहेत. शहरातील नागरिकांना वेळेत व अखंडित सेवा देण्यात वाहतूक व कर्मशाळा विभागात समन्वय दिसून येत नाही. यामुळे परिवहन विभागाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. वाहतूक विभागाचे प्रमुख कंदकुरे यांचे मार्गावर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. बसची संख्या वाढविण्याची सूचना करूनही कार्यशाळा व्यवस्थापक पडगानूर यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पुकाळे यांनी केली. चर्चेअंती हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. 

चेसी क्रॅक बसप्रकरणी लवादाने दिलेल्या निकालाविरूद्ध अपील करण्यासाठी अ‍ॅड. विजय मराठे यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. लवादाने अशोक लेलँडच्या बाजूने १६ एप्रिल रोजी निकाल दिला. २२ एप्रिल रोजी परिवहन विभागाला निकालाची प्रत मिळाली. या निकालाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी अ‍ॅड. मराठे यांचे नाव सुचविण्यात आले. त्यानुसार मराठे यांनी अपील करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करणे व इतर खर्चासाठी १0 लाखांची फी सांगितली आहे. 

याबाबत २१ मे रोजी प्रशासनाने परिवहन सभेकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. चर्चेअंती या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी सरकारने मिळविलेल्या यशाबाबत अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBus Driverबसचालक