सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस नाईक प्रमोद गवळी, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील हे २९ डिसेंबर रोजी सकाळी ६.३०च्या सुमारास सांगोला शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, कोपटेवस्ती ते सांगोला रोडवरील हाॅटेल रामदासीच्या पाठीमागील रस्त्यावरून एमएच १०/ एक्यू ८०७९ हा ट्रक येताना दिसला. पोलिसांनी चालकास इशारा करून थांबवला असता ट्रकमध्ये अर्धा ब्रास वाळू असल्याचे दिसून आले. याबाबत चालकाकडे सदर वाळूबाबत परमीट किंवा रॉयल्टी भरल्याची पावती आहे का? अशी विचारणा केली असता चालकांनी नसल्याचे सांगितले. पोलिसांनी वाळूसह टेम्पो ताब्यात घेतला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांनी सचिन सदाशिव खरात (रा. धायटी) व चालक प्रकाश संदीपान लवटे (कोपटेवस्ती-सांगोला) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अर्धा ब्रास वाळूसह ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST