शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा नदीची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न! मेधा पाटकर

By रवींद्र देशमुख | Updated: May 9, 2024 17:48 IST

पंढरपुरात समता वारी सोहळा

रविंद्र देशमुख, सोलापूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या संतभूमीत चंद्रभागेची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न झाल्याची भावना नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. त्या समता वारी सोहळा निमित्त पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत साने गुरुजी स्मारकाचे प्रमुख संजय गोपाळ प्रा. डॉक्टर राजेंद्र कुंभार जयसिंगपूर, राजन इंदुलकर, प्रा. रामचंद्र वाघ, भार्गव पवार उपस्थित होते.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, संतांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी संत विचार पिठाची गरज आहे. नव्या पिढीला ती प्रेरणा देणारी आहे. साने गुरुजींचे केवळ विचार व कार्य मनाला भावणारे आहे. संतांचे संघर्ष महत्त्वाचे असून त्यांचे विचार जिवंत आहेत.  संविधानाचे अधिकार पूर्ण करण्यासाठी विचारांची गरज सध्याच्या पिढीला आहे. या सद्य परिस्थितीत सरकारवर विश्वास ठेवू नये त्यांचे पक्षीय राजकारण वेगळं आहे. समाज राजकारण वेगळे आहे. समाजवादाची भूमिका त्यावेळी साने गुरुजींनी ठेवली होती. त्यांचे विचार व त्यांना मानणारे आजही आहेत. 

आजही जाती-धर्माच्या नावाने विभाजन होत असून अजूनही जातीवाद मिटला नाही.  जाती निर्मूलन हवे आहे परंतु असंवेदनशील सरकार संवाद साधायला तयार नाही याचे दुर्दैव वाटते. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असे आश्वासन या सरकारने दिले होते. परंतु स्वामीनाथन आयोगाच्या आधारावर शेतक-यांना दर मिळाला पाहिजे. त्यांनी तेच हटवले आहे. शेतकऱ्यांचे स्थान व सन्मान वाढला पाहिजे.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरPandharpurपंढरपूर