‘विठ्ठल’कडून गौरी-गणपतीनिमित्त सभासदांना १३० रुपयांचा दुसरा हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:17+5:302021-09-11T04:23:17+5:30

कुर्डूवाडी : विठ्ठल काॅर्पोरेशन (म्हैसगाव, ता. माढा)ने गौरी-गणपती सणानिमित्त २०२०-२१ या गाळप हंगामाकरिता गाळपास आलेल्या ऊस बिलापोटी दुसरा हप्ता ...

Second installment of Rs. 130 to members on the occasion of Gauri-Ganapati from 'Vitthal' | ‘विठ्ठल’कडून गौरी-गणपतीनिमित्त सभासदांना १३० रुपयांचा दुसरा हप्ता

‘विठ्ठल’कडून गौरी-गणपतीनिमित्त सभासदांना १३० रुपयांचा दुसरा हप्ता

Next

कुर्डूवाडी : विठ्ठल काॅर्पोरेशन (म्हैसगाव, ता. माढा)ने गौरी-गणपती सणानिमित्त २०२०-२१ या गाळप हंगामाकरिता गाळपास आलेल्या ऊस बिलापोटी दुसरा हप्ता प्रती मेट्रिक टन १३० रुपयेप्रमाणे सभासद व बिगर सभासद यांना गुरुवारपासून वाटप सुरू केल्याची माहिती विठ्ठल काॅर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिंदे व कार्यकारी सल्लागार एच. बी. डांगे यांनी दिली.

व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिंदे यांनी कारखान्याचा आगामी ऊस गाळप हंगाम २०२१-२२ करिता ऊस तोडणी वाहतूककरिता कारखान्याकडे करार करण्यात आलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टरगाडी कंत्राटदार यांना प्रथम हप्त्यापोटी यापूर्वी ४ कोटी ८ लाख ६० हजार रुपये वाटप केले. उर्वरित ट्रॅक्टरगाडी कंत्राटदार यांची प्रती ट्रॅक्टरगाडी दीड लाख प्रमाणे प्रथम हप्ता व ट्रक-ट्रॅक्टर वाहन कंत्राटदार यांची प्रती वाहन प्रथम हप्ता तीन लाख प्रमाणे वाहन कंत्राटदारांना वाटप सुरू केले आहे.

-----

Web Title: Second installment of Rs. 130 to members on the occasion of Gauri-Ganapati from 'Vitthal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.