शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सावित्रीच्या लेकींनी भरविला आठवडी बाजार

By admin | Updated: July 17, 2014 00:39 IST

महिला आर्थिक विकास महामंडळाचे पाठबळ: शौचालय बांधण्याची महिलांनी घेतली प्रतिज्ञा

सोलापूर: ग्रामीण भागात राहणाऱ्या मात्र महिला बचत गटाच्या माध्यमातून एकमेकींचा ‘पदर’ जुळलेल्या बोरगाव-देशमुख (ता़ अक्कलकोट) इथल्या ‘सावित्रीच्या लेकींनी’ मोठ्या धाडसाने गावात आठवडी बाजार सुरू केला़ दर बुधवारी हा बाजार भरणार असून, डिसेंबरअखेर प्रत्येक जणींनी घरात शौचालय बांधण्याचीदेखील प्रतिज्ञा घेतली़ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मआविम) पाठबळामुळे हे शक्य झाले़कोसो दूर जाऊन बाजार करण्यापेक्षा आपल्याच गावात आठवडी बाजार भरावा, ही बऱ्याच दिवसांची कल्पना महिलांनीच पूर्ण केली आहे़ यासाठी त्यांनी कोल्हापुरातील मंडपाळे गावात जाऊन पाहणी केली, प्रशिक्षण घेतले आणि गावात आठवडी बाजार सुरू करण्यासाठी पदर खोचला, त्यात त्यांना यश आले़ श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्र, ग्रामपंचायत आणि मआविम यांच्या संयुक्त विद्यमाने हा बाजार सुरू केला. बुधवारी सुमारे ३०० ते ४०० महिलांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी एस़ एम़ भालेराव, मआविमचे जिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे यांच्या हस्ते या आठवडी बाजाराचा शुभारंभ झाला़ अक्कलकोट शहरापासून सांगवीकडे जाणारा खड्ड्यांचा जीवघेणा रस्ता पार केल्यानंतर १५ किलोमीटरवर बोरगाव-देशमुख हे गाव लागते़ गाव पाणीदार मात्र आठवडी बाजार नसल्यामुळे वाहनाची विशेष सोय नसल्यामुळे पाच हजार लोकसंख्येचे गाव बऱ्याच दिवसांपासून आठवडी बाजारासाठी प्रयत्नशील होते़ याला बुधवारी मूर्त स्वरूप आले़ महिला आर्थिक विकास महामंडळाने बचत गटातील महिलांच्या पंखांना बळ दिले. यावेळी बँक आॅफ इंडियाचे शाखाधिकारी एल़ एम़ कांबळे, सहायक गटविकास अधिकारी वैजिनाथ साबळे, स्टेट बँकेचे शाखाधिकारी बी़ बी़ बोधनकर, पंचायत समितीच्या सभापती विमलताई गव्हाणे, सुवर्णाबाईआलुरे, मआविमच्या दीपाली अध्यापक, सरपंच सुनंदा कामशेट्टी, उपसरपंच मौलाली पठाण आदी उपस्थित होते़ शौचालये बांधली तर गावासाठी सर्व योजना देऊ, असे गटविकास अधिकारी भालेराव यांनी सांगितले आणि महादेव मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात डिसेंबरअखेर आम्ही शौचालये बांधून घेऊ, अशी प्रतिज्ञा महिलांना दिली़ शाखाधिकारी बोधनकर, पं़ स़ सभापती गव्हाणे यांनी बचत गटाच्या या कार्याचे कौतुक केले़सुप्रिया गायकवाड, शांता बंगरगे, सुचिता सुरवसे, सुनंदा देशेट्टी, स्वरांजली बिराजदार, सुवर्णा वाले, भाग्यश्री पाटील, सुमन फुलारे, सुलोचना गवी या महिलांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. ---------------------------------------------मशाल फेरी अन् पुरणपोळी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर हा आठवडी बाजार सुरू झाला़ यासाठी मंगळवारी रात्रभर पावसात महिलांनी गावातून मशाल फेरी काढून वातावरण निर्मिती केली़ बुधवारी सुमारे ६० महिलांनी भाजीपाल्यासह विविध वस्तंूचे स्टॉल लावले होत़े दर बुधवारी हा बाजार भरेल़ आठवडी बाजार पाहण्यासाठी बाहेरून आलेल्यांना पुरण-पोळीचे जेवण देण्यात आले़ --------------------------ज्या गावात आठवडी बाजार भरत नाही, जेथे बचत गटाचे कार्य चांगले आहे, अशा गावांमधील महिलांना प्रशिक्षण देऊन आम्ही आठवडी बाजार सुरू केला़ जिल्ह्यात मसलेचौधरी, सौंदणे या दोन ठिकाणी आठवडी बाजार नियमित सुरू आहे़ महिलांना खूप चांगला नफा यात मिळत आहे़ - कुंदन शिनगारेजिल्हा समन्वय अधिकारी मआविम