शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सैराट अन् प्रेमिस्ते.. प्रेमाची परिभाषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:24 IST

प्रेमिस्ते ही मुरुगन आणि ऐश्वर्या यांची प्रेमकथा. मदुराई शहरातील मेकॅनिकचे काम करणाऱ्या मुरुगनचे आयुष्य अगदी साधेसुधे होते. एकेदिवशी उच्चकुलीन ...

प्रेमिस्ते ही मुरुगन आणि ऐश्वर्या यांची प्रेमकथा. मदुराई शहरातील मेकॅनिकचे काम करणाऱ्या मुरुगनचे आयुष्य अगदी साधेसुधे होते. एकेदिवशी उच्चकुलीन श्रीमंत मुलीचे त्याच्यावर मन जडते. तिथून मुरुगनच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यांच्यातला विभिन्न भेद समजावून आपले नाते जुळू शकत नाही, हे तो सांगतो; मात्र ऐश्वर्याला काही ऐकून घ्यायचं नसतं. अखेर दोघांचे एकमत होते. पळून जाऊन मित्र स्टीफनच्या मदतीने ते लग्न करतात. आपल्या मुलीने परजातीतील गरीब मुलाशी लग्न केल्याचे कळताच ऐश्वर्याचे वडील संतापतात. नवदाम्पत्याला भुरळ पाडून चेन्नईवरून मदुराईला बोलावले जाते. वाटेत ऐश्वर्याच्या फार्महाऊसपाशी अडवले जाते, तिथे आधीच दबा धरून बसलेले तिचे नातलग त्यांच्यावर हल्लाबोल करतात. ऐश्वर्याचे वडील मुरुगनला क्रूरतेने बेदम मारहाण करतात. ऐश्वर्याच्या गळ्यात बांधलेले मांगल्यम तिने आपल्या हाताने काढून फेकून द्यावे म्हणून जीवावर उठतात. अखेर ऐश्वर्या ते तोडून फेकून देते. अर्धमेला झालेला मुरुगन मांगल्यमचा धागा हातात घेऊन तिथून खुरडत खुरडत निघून जातो. काही दिवसांनी ऐश्वर्याचे लग्न इच्छेविरुद्ध लावले जाते. ती सासरी जाते, तिला मूलबाळ होते. तिच्या पतीचे तिच्यावर प्रेम असते. अशीच वर्षे निघून जातात.

एकेदिवशी ती इलाजाच्या निमित्ताने चेन्नईला जाते तेव्हा एका ट्रॅफिक सिग्नलवर मळकटलेला वेडा भिकारी तिला दिसतो. पुढच्याच क्षणी तिच्या लक्षात येते की, हा तर मुरुगन ! त्या रात्री ती पतीच्या नकळत त्याला शोधत पुन्हा सिग्नलपाशी येते तर तो तिथेच हातवारे करत पुटपुटत उभा असतो, त्याच्या बोटांना करकचून बांधलेला मांगल्यमचा धागा अगदी त्याच्या कातडीत रुतलेला असतो. त्याला तशा अवस्थेत पाहून भररस्त्यात मध्यरात्रीस ऐश्वर्या टाहो फोडून आक्रोश करू लागते. इतक्यात तिचा पती तिथे येतो, आधी ती भेदरते; मात्र तो पुढे होत मुरुगनला आपल्या कवेत घेतो. एका बाजूला ऐश्वर्या नि दुसऱ्या बाजूला मुरुगनला घेऊन तिथून निघतो. इथे चित्रपट संपतो. श्रेयनामावलीसोबतच माहिती येते की, ऐश्वर्याचा पती मुरुगनला आपल्या सोबत नेतो आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करतो.

सिनेमा संपतो तेव्हा प्रेक्षक अक्षरशः धाय मोकलून थिएटरमध्ये रडलेले दिसले. नंतर याचे कन्नड, बंगाली, मराठी रिमेक बनवले गेले. प्रेमिस्तेने प्रेमाकडे कसे पाहायचे याची नवी दृष्टी दिली. २०१६ सालच्या ‘सैराट’मध्ये अशीच कथा होती; मात्र त्याचा पट आणि शेवट दोन्ही भिन्न होते. सैराटने मनातले मळभ रिते केले असले तरी त्यातून मन विषण्ण करणारी सत्यता समोर आली होती, तर प्रेमिस्तेने प्रेमाच्या त्यागाचा नवा अध्याय लिहिला ! विशेष म्हणजे सोलापूरकर रसिक प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना भरभरून दाद दिली होती.

‘प्रेमिस्ते’मध्ये नायक-नायिकेची भूमिका करणाऱ्या भारत, संध्यासाठी या सिनेमाचे दक्षिण दरवाजे कायमचे खुले झाले. सोलापूरची बहुभाषिक संस्कृती समृद्ध करण्यात अशा चित्रपटांचा मोठा वाटा आहे. कारण, यामुळेच शहरातला एकजिनसीपणा वाढला आहे. तेलुगू मायमराठीची ही बहीण आहे आणि या बहिणीने इथल्या जनतेला खूप प्रेम दिले आहे. हाही एक भाषाप्रेमाध्यायच होय !

- समीर गायकवाड

(लेखक साहित्य, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)