शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिक भयभीत, एकमेकांकडे चौकशी सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:58 IST

अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले. 

ठळक मुद्देआवाजाच्या तीव्रतेमुळे सिमेंट व पत्र्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्या, काचा, रस्त्यावरील वाहने, कार्यालयातील साहित्य हादरून गेलेआवाजाच्या तीव्रतेमुळे शहर व तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजतेकोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि १६ : शहर व तालुका  गूढ आवाजामुळे हादरून गेला. हा आवाज इतका मोठा होता की, आवाजामुळे सिमेंट, धाब्याच्या, पत्राच्या घरांतील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्यांच्या काचा हादरल्यामुळे जो तो घराच्या बाहेर येऊन कशाचा आवाजा झाला, याविषयी घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांकडे चौकशी करू लागला. दु. ३ वाजून ११ मि. अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले. शहरातील लोक ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातील लोक शहरातील मित्रपरिवार, नातेवाईकांना मोबाईलवरून संपर्क साधत आवाज कशाचा झाला, कोठून झाला, अशी चौकशी करू लागले. आवाजाच्या तीव्रतेमुळे सिमेंट व पत्र्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्या, काचा, रस्त्यावरील वाहने, कार्यालयातील साहित्य हादरून गेले. आवाजाच्या तीव्रतेमुळे शहर व तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते.नेमका आवाज कशाचा झाला, कोठून आला या निकषापर्यंत कोणालाही पोहोचता आले नाही. आवाजाविषयी प्रशासनाकडे चौकशी केली असता नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवून काय आवाज झाला का? आम्हाला माहीत नाही, माहिती घेऊन सांगतो , अशी समर्पक उत्तरे देऊन हात झटकले. -----------------सांगोल्यात गूढ आवाज झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आवाजामुळे कोणतीही वित्त अगर जीवितहानी झाली नाही. या आवाजासंदर्भात मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांना चौकशी करण्यास सांगितले असून, मीही या आवाजाविषयी माहिती घेत आहे.- संजय पाटीलतहसीलदार

टॅग्स :SolapurसोलापूरEarthquakeभूकंप