शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेटफळमधील केळीची परदेशात विक्री; सव्वादोन एकरात अकरा लाखांचे घेतले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:06 IST

वैभव पाटील या शेतकºयाची यशोगाथा; ड्रिपच्या माध्यमातून शेतीच्या उत्पादनात केली वाढ

ठळक मुद्देपाणी असलेल्या बहुतांश भागात जवळपास शेतक ºयांचा कल हा ऊसाकडे केळीसारख्या पिकातूनही त्याहून अधिक उत्पन्न घेऊ शकतो याची खात्री या वेगळ्या प्रयोगातून झालीया गावातील तरुण शेतकरी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग केला, त्यांनी केळी पिकाची निवड केली

नासीर कबीर करमाळा : पारंपरिक पिकाला कंटाळून उसाऐवजी केळीचे पीक घेण्याचा संकल्प केला... त्यांच्यासोबतच्या शेतकºयांनी गटशेतीचा मार्ग निवडला... सव्वादोन एकरात आठ ट्रॉली कुजलेले शेणखत वापरून केळीची लागवड केली... ड्रिपद्वारे पाणीपुरवठा केला... केळीची लागवड केली... अकरा महिन्यांत अकरा लाखांचे उत्पन्न घेणारे तरुण मार्गदर्शक शेतकरी ठरले आहेत.

वैभव पोळ असे त्या तरुण शेतकºयाचे नाव असून, त्यांनी शेटफळ (ता़ करमाळा) येथे हे पीक घेतले आहे़ त्यांनी केळी पिकाचे जवळपास एकरी ४० टन उत्पादन मिळवले आहे़ सध्या चांगला दर मिळत आहे़ त्यांना सव्वादोन एकर क्षेत्रातून ११ महिन्यांत १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

या गावातील तरुण शेतकरी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग केला़ त्यांनी केळी पिकाची निवड केली. याच माध्यमातून वैभव पोळ या तरुणाचे गावात पी.व्ही़सी. पाईप ठिबक व शेती उपयोगी साहित्याचे दुकान आहे. स्वत:चा व्यवसाय सांभाळत ते गेल्या चार-पाच वर्षांपासून आपल्या शेतात आधुनिक तंत्राचा वापर करून अनेक प्रकारची पिके घेताहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उसाचे पीक काढल्यानंतर गटशेतीच्या माध्यमातून २८ जानेवारी रोजी स्वत:च्या शेतात जैन टिश्यू कल्चरच्या केळीच्या रोपांची सात बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. तत्पूर्वी या क्षेत्रावर आठ ट्रेलर कुजलेले शेणखत टाकून मशागत केली. जैन कंपनीचे शेतीतज्ज्ञ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोपांच्या दोन्ही बाजूला ठिबक लाईन टाकून पाणी व्यवस्थापन केले. पुण्यातील कृषी तज्ज्ञ अविनाश कुलदीपकर यांच्याकडून रासायनिक खतासंबंधी माहिती घेतली़ त्यांच्याबरोबर काळाची गरज ओळखून शेतकरी गटाच्या माध्यमातून पीकप्रयोग सुरू केले़ त्यांच्या केळीच्या घडाचे वजन ३०-३५ किलो भरले आहे़ त्यांचा हा प्रयोग परिसरातील इतर शेतकºयांना मार्गदर्शक ठरला आहे.

पाणी असलेल्या बहुतांश भागात जवळपास शेतक ºयांचा कल हा ऊसाकडे आहे़ मात्र केळीसारख्या पिकातूनही त्याहून अधिक उत्पन्न घेऊ शकतो याची खात्री या वेगळ्या प्रयोगातून झाली़ हाच प्रयोग इतर शेतकºयांनीही करावा़ यातून वेगळी दिशा मिळू शकेल़ - वैभव पाटील, केळी उत्पादक, शेटफळ (करमाळा)

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारagricultureशेतीFarmerशेतकरी