शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वरांची २३ तर संत तुकारामांची पालखी २४ जूनला सोलापूर जिल्ह्यात येणार!

By appasaheb.patil | Updated: June 4, 2023 18:32 IST

प्र. जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की, भाविकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करावे.  

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन २३ जून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन २४ जून २०२३ रोजी असून, अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.  

दरवर्षीपेक्षा पालखी सोहळ्यांचे  प्रस्थान अगोदर होत असल्याने उन्हाळ्याचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेवून  पालखी तळावर व मार्गावर मुबलक पाणी पुरवठा व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांनी दिल्या.

यावेळी प्र. जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की, वारकरी भाविकांना पालखी तळांवर, मार्गावर शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची व पाण्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. तसेच, भाविकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करावे.  

आरोग्य विभागाने ओआरएस बरोबर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध, व्हावी यासाठी  दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्य दूत सुसज्ज ठेवावेत अशा विविध सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पालखी तळांवर व मार्गावर वारकरी भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर ६५ एकर, नदी पात्र तसेच शहरात नगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती  यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूर