शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

सफर माळढोक अभयारण्याची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 17:35 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे माळढोक अभयारण्य आहे़

आयुष्यात स्वत:साठी जगताना थोडंसं मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. अन् दैनंदिन व्याप सांभाळत स्वानंदासाठी हे करत  गेलो आणि तो कायमचा छंद बनून गेला.  गेल्या १०-११ वर्षांपासून पक्ष्यांची सेवा करतो. पक्ष्यांसाठी १२ महिने माझ्या घरातील अंगणात पिण्याचे पाणी आणि धान्याची सोय करतो. त्यांचा चिवचिवाट कायम आपल्यासोबत राहावा यासाठी कृत्रिम घरटे सुद्धा ठिकठिकाणी लावले आहेत. माझ्या अंगणात कोकिळा, भारद्वाज, राखी, धनेश, चिमण्या, ग्रीन बी ईटर, होला, बुलबुल, सनबर्ड, पोपट, रॉबिन, मुनिया, सुगरण इ. पक्षी नेहमी येतात. आजवर अनेक चिमण्यांनी, सिल्व्हर बिल, बुलबुल, राखी वटवट्या या पक्ष्यांनी माझ्या घरच्या अंगणात पिल्लांना जन्म दिला. रोज सकाळी उठल्यावर बाऊलमध्ये पाणी आहे का ? नसल्यास भरणे, कचरा पडलेला असल्यास साफ करून घेणे. धान्य संपल्यास पुन्हा घालणे हा नित्यनियम सुरू आहे. पाण्याच्या बाऊलमध्ये पक्षी पाणी पितात. अंघोळ करतात, छानसं खेळत असतात. 

माळढोक अभयाण्याबद्दल खूप ऐकलं होतं. मला खंत वाटायची. एकदातरी ते पाहायचं. केवळ वृत्तपत्रातून वाचले होते की या पक्ष्यामुळे सोलापूरचे नाव जगभर प्रसिद्ध झाले आहे. मी मित्रांना विचारायचो. परंतु, तेही पाहिले नाही हेच उत्तर देत. नेहमी बार्शीला गाडीवर जाताना नान्नज परिसर आला  की माझी मान नकळत रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या माळरानावर वळत असे. काही क्षण थांबून सुद्ध पाहायचो. परंतु, माळढोक काही दिसत नव्हता. काही दिवसांनी मला मानद वन्यजीव रक्षक डॉ. निनाद शहा यांचा नंबर मिळाला. मी त्यांना फोन करून माळढोकला पाहण्याची तीव्र इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी लागलीच होकार भरला. काही दिवसांनंतर आम्ही दोघेही नान्नजकडे रवाना झालो.

सकाळी ६.३० वाजता नान्नजच्या पन्नास हेक्टर परिसरात पोहोचलो. बाहेरच रस्त्यावर गाडी लावून चालत माळढोक दिसतो का पाहण्यासाठी निघालो. बराच वेळ निरीक्षण केले. परंतु, मोर आणि इतर पक्षी सोडले तर माळढोक काही दिसला नाही. तिथून अभयारण्याच्या शंभर हेक्टर परिसराकडे गेलो. तिथे वन कर्मचारी भागवत मस्के भेटले. शहा सरांनी माझी त्यांची ओळख करून दिली. आम्ही तिघेही तिथे असलेल्या निरीक्षण गृहातून निरीक्षण करत बसलो. शहा सरांनी सांगितले, शांत बसून निरीक्षण करत राहा. साधारण ११ वाजेपर्यंत आम्ही तिथे बसलो. परंतु, माळढोक दिसला नाही. आम्ही तिथून निघालो. माझे मन उदास झाले. मी म्हणालो, आता परत कधी? सर म्हणाले, येऊ दोन-चार दिवसांनी. चार-पाच दिवसांनी मी शहा सरांना नान्नजसाठी आठवण केली. मग ते म्हणाले तेथील (अभयारण्याचे) वातावरण बघून सांगतो. दुसºया दिवशी त्यांनी मस्केंना फोन करुन विचारले, तेव्हा त्यांच्याकडून माळढोक काल दिसला होता, असे कळाले. मग सर म्हणाले आपण दुपारीच निघू यात आणि आम्ही दुपारी ४ पर्यंत माळढोक अभयारण्यात पोहोचलो. माझ्या उत्सुकता ताणलेली.

आम्ही निरीक्षणगृहात जाऊन बसलो. दोन तास गेले आणि अचानक ५.३० च्या दरम्यान मला एक मोठा पक्षी उडताना दिसला आणि मी शहा सरांना म्हणालो बघा हा कोणता पक्षी आहे आणि दोघेही उत्तरले, माळढोक म्हणून. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही त्याच्या दिशेन कॅमेरा फिरवला. तोपर्यंत माळढोक ते माळरान व रस्ता ओलांडून दुसºया बाजूच्या माळरानावर गेला. मी आणि शहा सर १०० हेक्टरमधून बाहेर पडलो आणि दुसºया माळरानावर दबकतच गेलो. तिथे आम्हाला उंच, रुबाबदार असा हा माळढोक वावरताना दिसला. आम्ही आमच्या कॅमेºयात त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ अंधार होईपर्यंत आम्ही तेथेच त्याला पहात बसलो. आजचा दिवस सत्कारणी लागला म्हणून मी आनंदी झालो आणि परतलो. त्यानंतर अनेकवेळा माळढोकला पाहण्यासाठी अभयारण्याच्या चकरा सुरू झाल्या ते आजतागायत. अनेक राज्यातून माळढोकला पाहण्यासाठी लोक येतात हे त्यावेळी मला कळाले. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे.- अनिल जोशी(लेखक पर्यावरणप्रेमी आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरTravel Tipsट्रॅव्हल टिप्स