शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एस. टी. कामगार पुन्हा संपावर जाणार, २५ जानेवारीला अहवालाची होळी : नऊ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:54 IST

राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारून आपले गाºहाणे मांडले होते़ दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही ठेंगा दाखवल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढून त्यादिवशी पुन्हा एकदा संपावर जाण्याची तारीख निश्चित करण्याचा निर्णय आयोग कृती समितीने या बैठकीत घेतला.

ठळक मुद्दे२५ जानेवारी रोजी राज्यभरातील डेपो, युनिटच्या गेटवर उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणारकामगारांच्या आयोग कृती समितीची मुंबईत बैठकच्कामगारांच्या आयोग कृती समितीने वेतनापोटी १०७६ कोटींचा प्रस्ताव प्रशासनाला सादर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारून आपले गाºहाणे मांडले होते़ दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही ठेंगा दाखवल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढून त्यादिवशी पुन्हा एकदा संपावर जाण्याची तारीख निश्चित करण्याचा निर्णय आयोग कृती समितीने या बैठकीत घेतला. तत्पूर्वी २५ जानेवारी रोजी राज्यभरातील डेपो, युनिटच्या गेटवर उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणार आहे.कामगारांच्या आयोग कृती समितीची १९ जानेवारी रोजी मुंबईत बैठक झाली. यात नुकत्याच झालेल्या संपाच्या वेळी वेतनापोटी १०७६ कोटींचा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव आयोग कृती समितीने नाकारला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शिफारशीमध्ये पूर्वी प्रशासनाने देऊ केलेल्या २.५७ च्या सूत्राऐवजी २.३७ चे सूत्र दिलेले असून, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांऐवजी २ टक्के केला आहे. घरभाडे भत्त्यामध्ये १० टक्क्यांंऐवजी ७ टक्के, २० टक्क्यांऐवजी १४ टक्के, ३० टक्क्यांऐवजी २१ टक्के घट केली आहे. सुधारित वेतनवाढीची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ ऐवजी १ जानेवारी २०१८ पासून चार वर्षांसाठी करणे. या प्रस्तावामुळे एस. टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने उच्चस्तरीय समितीचा हा प्रस्ताव कृती समितीने फेटाळला आहे. संपासह अन्य आंदोलने करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार २५ जानेवारीला राज्यातील परिवहन महामंडळाच्या डेपो, युनिटच्या प्रवेशद्वारासमोर उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील एस. टी. कामगारांचा त्यांच्या कुटुंबीयांसह मुंबईत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी संपाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. या बैठकीस महाराष्टÑ एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, महाराष्टÑ एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, महाराष्टÑ मोटार कामगार फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी राजू भालेराव, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, विदर्भ एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पोहरे, एस.टी. कामगार, आयोग कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. ------------------------अपेक्षित वेतनवाढ नाही च्कामगारांच्या आयोग कृती समितीने वेतनापोटी १०७६ कोटींचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला होता. त्याला नकार दिल्याने उच्चस्तरीय समिती न्याय देईल या भावनेने तमाम कामगार वर्ग निश्चिंत असताना समितीने ठेंगा दाखवून अपेक्षित वेतनवाढ न दिल्याने कामगारांवर पुन्हा संपावर जाण्याची वेळ आल्याचे आयोग कृती समितीचे म्हणणे आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBus Driverबसचालक