शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रुक्मिणीबाई मेंगजी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:35 IST

सोलापूर : रुक्मिणीबाई नारायणराव मेंगजी (९२, रा. अशोक चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुली, मुलगा आणि नातवंडे ...

सोलापूर : रुक्मिणीबाई नारायणराव मेंगजी (९२, रा. अशोक चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. महेश काटवे यांच्या त्या आजी होत.

मोहम्मदअली शेख

सोलापूर : सेवानिवृत्त नायब तहसीलदार मोहम्मदअली नबीसाहेब शेख (८८, रा. आसरा सोसायटी, होडगी रोड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील पर्यवेक्षक समीर शेख यांचे वडील होत.

गुलाम मुजावर

सोलापूर : गुलाम दस्तगीर मुजावर

(८३, रा. टंगसाल नगर, आसरा चाैक, हाेटगी राेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. ते विमा कार्यालय साेलापूर येथून सेवानिवृत्त झाले होते.

काशीबाई मठपती

सोलापूर : काशीबाई मठपती (१०५, रा. बिरनाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

रेवम्मा याळगी - कुंभार

सोलापूर : रेवम्मा सिद्रामप्पा याळगी-कुंभार (७१, रा. शहापूर, जिल्हा कलबुर्गी ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शहापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका नागरत्न चंद्रशेखर याळगी-कुंभार व पत्रकार विरुपाक्ष कुंभार यांचे त्या सासू होत.

ताराबाई बिराजदार

सोलापूर : ताराबाई रेवणसिध्द बिराजदार(८८, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर )यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले. दोन मुली. सुना नातवंडे असा परिवार आहे. सिध्देश्वर कारखान्यातील कामगार युनियनचे अशोक बिराजदार यांच्या त्या मातोश्री होत.

नागनाथ काळे

अनगर : कपड्याचे व्यापारी नागनाथ महादेव काळे (७१, रा. अनगर, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उपजिल्हाधिकारी विवेक काळे व डाॅ. वैभव काळे यांचे चुलते होत.

शांतेश कट्टी

सोलापूर : मध्य रेल्वेचे सेवानिवृत्त टीटी शांतेश मल्लप्पा कट्टी (७९, रा. जवान नगर, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

इरय्या स्वामी

सोलापूर : इरय्या दिनय्या स्वामी (८१, रा.भीमा नगर, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संगमेश्वर महाविद्यालयाचे कर्मचारी वैजीनाथ स्वामी यांचे वडील होत.