शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाकाठी दहा हजारांचा महसूल देणाºया रिक्षावाल्यांना हवीय दरमहा सात हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:03 IST

लॉकडाऊनमुळे १८ हजार चालक हतबल; दिल्ली, आंध्र, कर्नाटकात पाच तर गुजरातमध्ये दहा हजारांची मदत

ठळक मुद्देइंधन दरवाढ तुलनेत रिक्षाचालकांना दरवर्षी आरटीओकडून दर ठरवून घ्यावा लागतो दरवाढी संदर्भात २०१७ साली खटवा आणि हकीम समिती नेमलीमागील आठ वर्षांत रिक्षाचालकांना एकदाही दरवाढ करता आली नाही

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून पाहिल्या जाणाºया रिक्षाचालकांची कोरोना काळात उपासमार थांबलेली नाही. दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र सरकारने पाच हजारांची तर गुजरात सरकारने दहा हजारांची मदत करून रिक्षाचालकांना दिलासा दिला; मात्र वर्षाला दहा हजारांचा महसूल देणारे सोलापुरातील १८ हजार रिक्षाचालक या काळात उपेक्षित राहिले आहेत.

 सोलापूर शहरात सध्या सहा हजार रिक्षाचालक तर ग्रामीण भागात १२ हजार रिक्षाचालक आहेत. कोरोना काळात सॅनिटायझर करणे, पडदा लावणे अशा नियमांची सक्ती करून खर्च वाढवला.

एक लाख लोकसंख्येमागे ८०० परवाने देणे नियम असताना शासनाने महसूल मिळवण्याच्या नादात ‘मागेल त्याला परवाना’ देऊन रिक्षा व्यावसायिकांमध्ये जीवघेणी स्पर्धा लावून दिली. या नवीन परवान्यामुळे कर्ज काढून अनेकांनी रिक्षा घेतल्या़ आज पहिल्या एक किलोमीटरला ११ रुपयांनी सुरुवात होते. मीटरप्रमाणे होणारे भाडे प्रवाशांना परवडत नाही; मात्र मागील आठ वर्षांत इंधन दरात अनेकदा वाढ झाली. एलपीजीचा दर ४० रुपये लिटर झाला आहे. सध्या रिक्षाचालक अनेक समस्यांच्या कात्रीत  सापडला आहे़ पोलीस ठाण्यांना मोजक्याच रिक्षा लावून नियम, अटी घालण्यात आल्या. घुसमट सहन करून जगणाºया रिक्षाचालकांना महाराष्ट्र सरकारकडून ना करात सवलत मिळाली, ना आर्थिक मदत मिळाली.

हकीम समितीची अंमलबजावणी कधी?-  इंधन दरवाढ तुलनेत रिक्षाचालकांना दरवर्षी आरटीओकडून दर ठरवून घ्यावा लागतो़ दरवाढी संदर्भात २०१७ साली खटवा आणि हकीम समिती नेमली. या समितीने दरवर्षी रिक्षाचालकांना भाडेवाढीला मान्यता दिली. याची अद्याप अंमलबजावणी नाही़ - सोलापुरात २०१२ साली आरटीओने शेवटची दरवाढ दिली. मागील आठ वर्षांत रिक्षाचालकांना एकदाही दरवाढ करता आली नाही. जीवघेणी स्पर्धा कमी करण्यासाठी २०१८-१९ मध्ये नव्याने परवाना देणे थांबवण्यासाठी त्यांनी आंदोलने केली़

रिक्षाचालकांपुढील प्रश्न आजही सुटलेले नाहीत़ कल्याणकारी मंडळाचा विषय अन् तीन हजार पेन्शन देण्याचा विषयही बाजूला पडला. किमान कोरोना काळात सरकारने कर्नाटक आणि गुजरात सरकारच्या धर्तीवर मदत करावी़ शक्यच नसेल तर विविध प्रकारचा वार्षिक कर रद्द करावा अशी अपेक्षा आहे.- महिपती पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल

लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांवर शासनाचे निर्बंध आले. ते ठिक आहे; मात्र सरकारने या काळात महिना ७५०० रुपयांची मदत द्यावी. या मदतीसाठी ५ मे आणि त्या पूर्वीपासून मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय. खासगी सावकार आणि फायनान्स तगादा थांबवण्यासाठी कर्ज पुनर्गठित करावे़ - सलीम मुल्लाराज्य सचिव, सीआयटी महाराष्ट्र

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या