शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदावडेत माऊलींचे गोल रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:43 IST

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा बुधवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला.

- गोपालकृष्ण मांडवकर पुरंदावडे (जि. सोलापूर) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा बुधवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. माऊलींच्या अश्वांनी घातलेले रिंगण, टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींच्या जयघोषातील हा सुखसोहळा लक्षावधी नेत्रांनी अनुभवला. रिंगण सोहळ्यानंतर दिंडीकऱ्यांचा उडीचा खेळ रंगला अन् सजलाही.नातेपुते येथील पालखी तळावरील मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी ६ वाजता पालखी सोहळा मांडवी ओढ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. मांडवी ओढा परिसरात माऊलींचा दुपारचा नैवेद्य झाल्याने लांबवरची चाल करून आलेले वारकरीही काही काळ विसावले. त्यानंतर दुपारी माऊलींच्या निघण्याची तयारी झाली. गोल रिंगण आणि उडीच्या खेळाच्या आतुरतेने सोहळा पुरंदावडेला पोहोचला. गोल रिंगणचे मैदान दुपारपासूनच गर्दीने फुलून गेले होते. दुपारी पावणेतीन वाजता माऊलींच्या रथाचे आगमन झाले. जरीपटक्याचे निशाण असलेल्या स्वाराच्या अश्वाने रिंगणात प्रवेश केला.त्यापाठोपाठ वैष्णव मेळा पोहोचताच लाखोंच्या जनसमुदायाने टाळ्यांचा गजर केला. माऊली-माऊली अशा जयघोषात माऊली बाहेरचे गोल रिंगण फिरून मानाच्या दिंड्यांसह रिंगणस्थळी सजवलेल्या चबुतºयावर विराजमान झाली. गोल रिंगण पूर्ण झाल्यावर परंपरेनुसार चोपदारांनी सर्व दिंड्यांना उडीच्या खेळाचे निमंत्रण दिले. वारीतील हा सर्वांग सुंदर सोहळा असतो. माऊली आणि विठ्ठलाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या साथीने उडीचा खेळ तब्बल २० मिनिटे रंगला. वारीतील शीणभाग विसरून दिंडीकरी या खेळात तल्लीन झाले होते. गोलाकार पद्धतीने बसून भाविकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी