शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

लोकशाही सशक्तीकरणात युवकांची भूमिका महत्वाची, राज्य निवडणूक आयुक्त ज़ स़ सहारिया यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:12 IST

लोकशाही सशक्त होण्यासाठी तरुणाईची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहरिया यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठातर्फे लोकशाही पंधरवडा कार्यक्रमात लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र मतदार यादीत आपले नांव आहे का हे प्रत्येक नागरिकांने तपासायला हवे : सहारियास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप म्हणावे तितके संशोधन झालेले नाही : सहारिया

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर  दि. ७ :  लोकशाही सशक्त होण्यासाठी तरुणाईची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहरिया यांनी आज येथे केले.सोलापूर विद्यापीठातर्फे लोकशाही पंधरवडा कार्यक्रमात लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उदघाटनाच्या भाषणात जे़ स़ सहारिया बोलत होते. सोलापूर विद्यापीठातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रभारी कुलगुरु नितीन करमळकर, राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर महापालिकेचे आयुक्त  डॉ. अविनाश ढाकणे, कुलसचिव डी.आर. मंझा आदी उपस्थित होते.सहारिया म्हणाले, भारतीय लोकशाही सशक्त आणि अधिक मजबूत होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. नवीन आणि तरुण मतदांरानी यासाठी पुढाकार घ्यायलय हवा. तरुणांनी मतदार यादीत नांवनोंदणी तर करायला हवी. त्याचबरोबर मतदानाचा हक्क बजावयाला हवा. लोकशाही बळकट होण्यासाठी तरुणांच्या बरोबरच विद्यापीठे महत्वाची भूमिका बजावू शकतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप म्हणावे तितके संशोधन झालेले नाही. अशा प्रकारचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आयुक्त ज.स. सहारिया यांनी केले.मतदार यादीत आपले नांव आहे का हे प्रत्येक नागरिकांने तपासायला हवे. मतदार यादी अद्यावत करण्याचे काम सतत सुरु असते. नागरिकांनी दुबार मतदार नांवनोंदणी स्वत:हून कमी करावी. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीचे नांव कमी करावे. प्रत्येक तरुणाने आपले नांव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि प्रसार माध्यमे या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदिश मोरे आणि सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी  सहभागी झाले.सायंकाळच्या सत्रात निवडणूक आयोगाचे सचिन शेखर चन्ने यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे संयोजन डॉ. रवींद्र चिंचोळकर यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूक